बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?

मेगा डीलमुळे IPL खेळण्यावर कशी मर्यादा येईल?

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 17:31 IST2026-05-07T17:30:11+5:302026-05-07T17:31:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Kavya Maran Own SRH Captain Pat Cummins 113 Crore Deal Amid Reports Of Leaving IPL 2026 For Mega Offer | बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?

बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स IPL मध्ये काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करत आहे. दुखापतीतून सावरून SRH च्या संघाकडून त्याने दमदार पुनरागमन करत लक्षवेधून घेतले असताना त्याच्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. ऑरेंज आर्मीचा 'सेनापती'साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ११३ कोटींची ऑफर दिली असून तो या मेगा डीलसाठी IPL सोडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पॅट कमिन्सला ११३ कोटींची मेगा ऑफर

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला दीर्घकालीन करारासाठी मोठी ऑफर दिली आहे. त्याने राष्ट्रीय संघाकडून कसोटी क्रिकेटरला प्राथमिकता द्यावी, यासाठी ऑस्ट्रेलिया त्याच्यावर पैशांची 'बरसात' करण्यासाठी तयार आहे.  या नव्या करारानुसार २०२९ पर्यंत कसोटी क्रिकेटलाच त्याचे पहिले प्राधान्य राहिल. यासाठी तीन वर्षांत त्याला जवळपास ११३ कोटी एवढी मोठी रक्कम मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.  

IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

मेगा डीलचा IPL खेळण्यावर काय परिणाम होईल?

सध्याच्या घडीला पॅट कमिन्स हा आयपीएलमधील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याच्यासाठी १८ कोटी रुपये मोजले आहेत. जर ऑस्ट्रेलियन क्रिकेटसोबत त्याची मेगा डील फायनल झाली तर त्याचा अप्रत्यक्षरित्या फ्रँचायझी टी-२० क्रिकेटवर परिणाम होईल. कसोटीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्याला टी-२० खेळण्यावर मर्यादा येतील.  या नव्या करारामुळे ३२ वर्षीय ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजाच्या वार्षिक उत्पन्नात जवळपास ८.५ कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. तो सध्या ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये १५ व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीतही तो मोठी झेप घेऊ शकतो. 

आपल्या खेळाडूंना IPL  सारख्या फ्रँचायझी लीगपासून दूर ठेवण्याचा डाव? 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हेड ऑफ क्रिकेट जेम्स ऑलसॉप (James Allsopp) यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ऑस्ट्रेलियन संघातील वरिष्ठ खेळाडू चांगल्या कराराचे हक्कदार असल्याचे म्हटले आहे. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि ट्रॅविस हेड यासारखे खेळाडू तिन्ही प्रकारात सर्वोत्तम आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. अशा खेळाडूंना ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी जोडून ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे, असे म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य आपल्या खेळाडूंना अन्य फ्रँचायझी लीगकडे आकर्षित होण्यापासून रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड पैसा खर्च करायला तयार असल्याचे दर्शवते. 

Web Title : पैट कमिंस क्या आईपीएल छोड़ क्रिकेट ऑस्ट्रेलिया के साथ करेंगे बड़ी डील?

Web Summary : पैट कमिंस को क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने 113 करोड़ रुपये का बड़ा ऑफर दिया है ताकि वह 2029 तक टेस्ट क्रिकेट को प्राथमिकता दें। इस डील से उनका टी20 खेलना सीमित हो सकता है और उनकी कमाई काफी बढ़ सकती है, जिससे वह ऑस्ट्रेलिया के सबसे ज्यादा कमाई करने वाले खिलाड़ियों में से एक बन जाएंगे।

Web Title : Pat Cummins may leave IPL for a massive Cricket Australia deal.

Web Summary : Pat Cummins may quit IPL as Cricket Australia offers him a massive deal worth ₹113 crore to prioritize Test cricket until 2029. The deal could limit his T20 involvement and significantly boost his earnings, making him one of Australia's highest-paid players.