ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:06 IST2026-05-07T18:05:17+5:302026-05-07T18:06:17+5:30
Massive Dust Storm Eknath Shinde Helicopter emergency landing: जुहू येथे हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग करावे लागले

ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
Massive Dust Storm: महाराष्ट्रात गुरूवारी दुपारी अचानक हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. अशातच आज मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली भागात दुपारनंतर वादळ आले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. ठाणे आणि कल्याणमध्ये वादळामुळे धुराचे आणि धुळीचे लोट उडू लागले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, या वादळी वाऱ्याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला बसला. त्यांच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले.
4:30 PM.. Duststorm alert for Thane & MMR for next 1 hour ⛈️⚠️
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2026
Huge thunderstorms have formed over MMR and are heading towards Thane & Mumbai
Many parts will witness lightning and intense rains
Live visuals from Mulund ⚡
Mumbai on standby alert for next hour #MumbaiRainspic.twitter.com/DsNsBR5Jw3
एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावले. त्यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी दुपारी खराब हवामानाचा फटका बसला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडले. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लगेचच सुरक्षितपणे खाली उतरवले. शिंदे एका नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरून उड्डाण झाले होते. हा दौरा कल्याण आणि मुरबाड परिसराचा होता. पण वादळी वाऱ्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, हेलिकॉप्टरचे आपात्कालीन लँडिंग करण्यात आले.
4:30 PM.. Duststorm alert for Thane & MMR for next 1 hour ⛈️⚠️
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2026
Huge thunderstorms have formed over MMR and are heading towards Thane & Mumbai
Many parts will witness lightning and intense rains
Live visuals from Mulund ⚡
Mumbai on standby alert for next hour #MumbaiRainspic.twitter.com/DsNsBR5Jw3
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते?
या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोजकीच मंडळी होती. यात स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत आणि मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्यासह एकूण ८ जण हेलिकॉप्टरमध्ये होते. सुदैवाने या घटनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. जुहू एअरपोर्टवर उतरल्यानंतर सर्वांची तपासणी करण्यात आली.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत धुळीचे लोट, लोणावळ्यात पाऊस
ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात वारा सुटला. त्याचबरोबर काळोखी पसरली आणि धुळीचे लोट पाहायला मिळाले. याशिवाय लोणावळा आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतही काही ठिकाणी पाऊस पडल्याचे दिसून आले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ७ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. तर कोकण-गोवा भागातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता होती.
#MumbaiRains | 3:45 PM
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2026
Heavy rains over Lonavala & Mumbai - Pune expressway. Rains also noticed in eastern parts of MMR. Interior parts of Thane may get rain next 1-2 hours ⛈️
Stay tuned for live updates pic.twitter.com/scAfapFeWp