अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:42 IST2026-05-07T12:40:33+5:302026-05-07T12:42:19+5:30

Shocking Footage: अमेरिकेतील न्यू जर्सी येथील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली.

Shocking Footage: Boeing 767 Collides with Truck Near Newark Airport; Dashcam Captures the Horror | अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!

अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. लँडिंगसाठी येत असलेल्या युनायटेड एअरलाईन्सच्या बोईंग ७६७ विमानाचा खालचा भाग आणि लँडिंग गिअरचे टायर महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकला धडकले. या भीषण अपघातातून ट्रक चालक चमत्कारिकरित्या बचावला असून, या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  युनायटेड एअरलाईन्सचे 'फ्लाईट १६९' हे विमान इटलीतील वेनिस येथून नेवार्कला येत होते. विमानात २२१ प्रवासी आणि १० कर्मचारी होते. विमानतळाच्या धावपट्टीजवळून जाणाऱ्या 'न्यू जर्सी टर्नपाईक' महामार्गावरून जात असताना विमान खालून उडत होते. लँडिंगच्या काही सेकंद आधी विमानाने प्रथम एका स्ट्रीट लाईटच्या खांबाला आणि त्यानंतर तिथे जाणाऱ्या बेकरी उत्पादनांच्या ट्रकला धडक दिली. ट्रकमध्ये बसवलेल्या डॅशकॅम व्हिडिओमध्ये हा थरार कैद झाला आहे. 

दरम्यान, चालक वॉरेन बोर्डले आपल्या ट्रकमध्ये गाणे गात गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. अचानक विमानाचा प्रचंड आवाज आल्याने त्याने वर पाहिले आणि पुढच्याच क्षणी विमानाची धडक बसून ट्रकची काच फुटली. काचेचे तुकडे अंगावर उडाल्याने वॉरेन यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्यांचा जीव वाचला.

विमानाने ट्रकला धडक देऊनही वैमानिकाने विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवले. सुदैवाने, विमानातील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या घटनेला अपघात म्हणून घोषित केले असून या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. विमानाच्या वैमानिकांना तपासापर्यंत सेवेतून बाजूला करण्यात आले आहे.

Web Title : अमेरिका: विमान लैंडिंग के दौरान ट्रक से टकराया; वीडियो वायरल

Web Summary : न्यू जर्सी में यूनाइटेड एयरलाइंस का विमान लैंडिंग के दौरान राजमार्ग पर ट्रक से टकरा गया। ट्रक ड्राइवर बाल-बाल बचा। 221 यात्रियों वाला विमान सुरक्षित उतरा, जांच जारी है।

Web Title : Plane hits truck during landing in US; video viral

Web Summary : A United Airlines plane struck a truck on a New Jersey highway during landing. The truck driver miraculously survived. The plane, carrying 221 passengers, landed safely. Investigation underway.