ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी दोरी-लटकनचे १० सुंदर पॅटर्न्स; हॉट-युनिक दिसेल मागचा गळा
Updated:May 3, 2026 16:24 IST2026-05-03T15:36:08+5:302026-05-03T16:24:08+5:30
Blouse Back Neck Dori Designs : असे हेवी बॅक डिझाईन्स प्रामुख्यानं काठपदराच्या साड्या, पैठणी किंवा लग्नातील लेहेंग्यावर अतिशय रॉयल दिसतात.

आजकाल ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला केवळ साध्या नॉट न लावता अतिशय कलात्मक आणि शाही पद्धतीचे डिझाईन्स बनवण्याची बरीच क्रेझ आहे. काही डिझाईन्स पाहूया. (Blouse Back Neck Dori Designs)
गळ्याच्या वरच्या भागात दोनपेक्षा जास्त दोऱ्या वापरून क्रिस क्रॉस किंवा जाळीदार विणकाम केले जाते. ज्यामुळे खांद्यावर ब्लाऊज व्यवस्थित बसतो. (Blouse Back Neck Dori And Latkan Designs)
साध्या एका लटकनऐवजी आता वेगवेगळ्या थरांचे लटकन लावले जातात. यात मखमली धागे, मणी आणि जरीचा वापर करून झुमका स्टाईल लटकन बनवले जाते.
केवळ कापडी दोऱ्या न वापरता ब्लाऊजच्या खालच्या बाजूला मोत्यांच्या किंवा सोन्याच्या रंगाच्या दोऱ्या लावल्या जातात.
ब्लाऊजच्या मध्यभागी एखादा मोठा कुंदनचा किंवा खड्यांचा ब्रॉच लावून तिथून लटकन सोडले जातात. जे एखाद्या कमरपट्ट्यासारखे दिसते.
गळ्याच्या कडेला स्कॅल्प किवा कटवर्कची किनार देऊन त्यावर जरदोजी किंवा मण्यांचे बारीक काम केले जाते. जे डिझाईनला अधिक उठाव देते.
पिवळ्या ब्लाऊजवर मरून किंवा राणी रंगाचे लटकन वापरल्यामुळे रंगांचा विरोधाभास निर्माण होतो जो लांबूनही उठून दिसतो.
असे हेवी बॅक डिझाईन्स प्रामुख्यानं काठपदराच्या साड्या, पैठणी किंवा लग्नातील लेहेंग्यावर अतिशय रॉयल दिसतात.
असे डिझाईन्स शिवताना टेलरला गळ्याची खोली आणि दोऱ्यांची लांबी व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून ते घालताना टोचणार नाहीत आणि सुटसुटीत बसतील.
या डिझाईन्समध्ये तुम्हाला सिंपल ते हेवी वेडींग लूक बऱ्याच प्रकारच्या गळ्याचे प्रकार शिवता येतील.