हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

Updated:May 3, 2026 15:52 IST2026-05-03T15:43:06+5:302026-05-03T15:52:33+5:30

'स्लीपिंग ब्युटी' किंवा 'स्लीपिंग प्रिन्स' सारखे कपडे घालून येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

दक्षिण कोरिया हा देश आपल्या जीवनशैलीसाठी आणि नाईट लाईफसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, याच झगमगाटाच्या मागे एक भयंकर वास्तव आहे ते म्हणजे येथील तरुण पिढी झोपेच्या समस्येचा सामना करत आहे. (फोटो - Reuters)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

ही समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि लोकांना थोडी विश्रांती मिळावी यासाठी सियोल मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंटने शनिवारी एका 'पावर नॅप कॉन्टेस्ट' (Power Nap Contest) चे आयोजन केलं होतं. (फोटो - Reuters)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हजारो तरुण-तरुणी पार्कमध्ये जमले होते. तसेच सहभागी होण्यासाठी काही मजेशीर अटी देखील ठेवण्यात आल्या होत्या.

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

स्पर्धक थकलेला असावा आणि त्याने पोटभर जेवून यावं अशी अट होती. तसेच 'स्लीपिंग ब्युटी' किंवा 'स्लीपिंग प्रिन्स' सारखे कपडे घालून येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

स्पर्धेत अनेकजण भन्नाट वेशभूषा करून आले होते. २० वर्षीय विद्यार्थी पार्क जून-सिओक हा जोसियन राजवंशाच्या सम्राटाचा रेशमी पोशाख घालून आला होता. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

"परिक्षेची तयारी आणि पार्ट-टाइम जॉबमुळे मला दिवसातून फक्त तीन-चार तास झोप मिळते. एक राजा कसा झोपतो, हे दाखवण्यासाठी मी येथे आलो आहे" असे त्याने सांगितले. (फोटो - Reuters)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

निद्रानाशाने त्रस्त असलेल्या २४ वर्षीय शिक्षिका यू मी-योन या 'कोआला'चा पेहराव करून आल्या होत्या, जेणेकरून त्यांना शांत झोप घेता येईल. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

दक्षिण कोरिया हा OECD देशांमध्ये सर्वाधिक काम करणारा आणि सर्वात कमी झोपेचा आनंद घेणारा देश मानला जातो. येथील लोक जगात सर्वात कमी तास झोपतात. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

याच गंभीर समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी सरकारने या स्पर्धेचे आयोजन केलं होतं. दुपारी ३ वाजता स्पर्धा सुरू झाली आणि डोळ्यांवर मास्क लावताच संपूर्ण पार्कमध्ये शांतता पसरली. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

स्पर्धक किती गाढ आणि शांत झोपले आहेत, हे तपासण्यासाठी अधिकारी त्यांचा हार्ट रेट चेक करत होते. या अनोख्या स्पर्धेत एका ८० वर्षीय वृद्धाने प्रथम क्रमांक पटकावला. (फोटो - AP)

हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'

३७ वर्षीय ऑफिस कर्मचारी ह्वांग डू-सॉन्ग दुसऱ्या स्थानावर होते. ह्वांग म्हणाले की, "नाईट शिफ्ट आणि ड्रायव्हिंगमुळे मी खूप थकलो होतो. नदीकाठी वाहणाऱ्या थंड हवेत स्वतःला रिचार्ज करण्यासाठी मी येथे आलो होतो." (फोटो - Reuters)