लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

Updated:May 1, 2026 19:00 IST2026-05-01T19:00:00+5:302026-05-01T19:00:02+5:30

how to choose the right first bra for your daughter : important tips for mothers buying first bra for girls : लेकीसाठी पहिली ब्रेसियर घेताना लक्षात ठेवाव्यात अशा खास टिप्स...

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

मुलगी मोठी होत असताना तिच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडत असतात. या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि समजूतदारपणे घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात, त्यापैकीच एक महत्त्वाचा विषय म्हणजे पहिली ब्रेसियर निवडणे. अनेक मुलींना या विषयावर बोलताना संकोच वाटतो, त्यामुळे आईची भूमिका येथे खूप महत्त्वाची ठरते. योग्य फिट, आरामदायी फॅब्रिक आणि योग्य साईज निवडल्यास मुलीला आत्मविश्वास मिळतो आणि ती अधिक कम्फर्टेबल वाटते(how to choose first bra for daughter).

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

मुलीच्या बालपणाकडून तारुण्याकडे होणारा प्रवास हा जितका आनंददायी असतो, तितकाच तो तिच्यासाठी अनेक शंका आणि संकोच घेऊन येणारा असू शकतो. वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल स्वीकारताना तिला आईच्या पाठिंब्याची सर्वात जास्त गरज असते. आपली मुलगी आता मोठी होत आहे, हे समजून घेऊन तिला योग्य वेळी पहिली ब्रेसियर (First Bra) निवडण्यात मदत करणे, हा केवळ शारीरिक गरजेचा भाग नाही तर तिच्या आत्मविश्वासासाठीही महत्त्वाचा आहे.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि हा अनुभव तिच्यासाठी सोयीस्कर कसा करावा, याबद्दलच्या काही खास टिप्स पाहूयात.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

हा बदल शारीरिक असला तरी मानसिकदृष्ट्या मुलीसाठी नवीन असतो. त्यामुळे तिच्याशी मोकळेपणाने बोला, जेणेकरून तिला संकोच वाटणार नाही.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

प्रत्येक मुलीची शारीरिक वाढ वेगळी असते; जेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागेल किंवा कपड्यांमधून स्तनांची वाढ दिसू लागेल, तेव्हा तिला ब्रेसियरची गरज आहे हे ओळखा.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

मुलीची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे नेहमी शुद्ध कॉटनच्याच ब्रेसियरची निवड करावी. यामुळे घाम साचणार नाही आणि त्वचेला खाज किंवा रॅशेस येणार नाहीत.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

पहिल्या ब्रेसियरसाठी जड पॅडिंग किंवा अंडरवायर असलेल्या ब्रेसियरची अजिबात गरज नसते. साधी 'टीनएज ब्रेसियर' (Teenage Bra) किंवा 'कॅमिझोल' (Camisole) अधिक आरामदायी ठरते.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

सुरुवातीला अनेक मुलींना साधी ब्रेसियर घालणे अवघड वाटू शकते. अशा वेळी स्पोर्ट्स ब्रेसियर (Sports Bra) उत्तम आधार देते आणि ती घालणेही सोपे असते.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

ब्रेसियर खूप घट्ट नसावी कारण त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो आणि खूप सैलही नसावी; घेण्यापूर्वी तिचे माप नीट मोजून घ्या.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

तिला आवडणारे रंग किंवा साधे डिझाईन्स निवडण्याचे स्वातंत्र्य तिला द्या, जेणेकरून ती आत्मविश्वासाने ती वापरू शकेल.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

स्ट्रॅप्स खूप घट्ट नसावेत आणि बॅक हुक्स योग्य प्रकारे बसतील याची खात्री करा. पहिली ब्रेसियर निवडताना त्याचे पट्टे (Straps) ऍडजस्ट करता येतील असे असावेत. मुलगी वाढत असताना तिच्या सोयीनुसार ते सैल किंवा घट्ट करता येतात.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

ब्रेसियरची निवड करण्यासोबतच ती दररोज बदलणे आणि स्वच्छ धुणे का गरजेचे आहे, हे तिला आवर्जून सांगा. घामामुळे त्वचेचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

जर ती थेट ब्रेसियर घालण्यास नको म्हणतं असेल, तर सुरुवातीला तिला क्रॉप टॉप्स (Crop Tops) किंवा बनियन स्टाइल ब्रेसियर द्या. यामुळे तिला सवय होण्यास मदत होईल.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

नवीन कपड्यांमुळे तिला अवघडल्यासारखे वाटू शकते. अशा वेळी ती किती छान दिसत आहे आणि हा बदल तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे, असे सांगून तिचा आत्मविश्वास वाढवा.

लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...

तिला सोबत घेऊन शॉपिंगला गेल्यामुळे तिला स्वतःचे माप आणि आवडीचे रंग निवडता येतील. यामुळे तिला या नवीन बदलाची भीती वाटण्याऐवजी उत्साह वाटेल.