कुणी चांगलं म्हणावं-कौतुक करावं म्हणून सतत दुसऱ्यावर अवलंबून राहता? ५ गोष्टी-व्हा इमोशनली इंडिपेंडट
Updated:April 30, 2026 22:00 IST2026-04-30T22:00:00+5:302026-04-30T22:00:02+5:30
Ways to overcome the habit of people pleasing: Psychological tips: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी कोणते ६ बदल आवश्यक आहेत, ते जाणून घेऊया.

बरेचदा आपण आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी दुसऱ्या कोणाचा तरी आधार घेतो. मग तो एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे असो, आर्थिक मदत असो किंवा मानसिक आधार. जेव्हा आपण सतत कुणावर तरी अवलंबून राहतो, तेव्हा नकळत आपण आपल्या प्रगतीचे दोर दुसऱ्यांच्या हातात सोपवतो. लोक काय म्हणतील किंवा कुणीतरी आपल्याला मदत करेलच या विचारांमुळे आपण कायमच कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहतो. हा कम्फर्ट दिसायला छान वाटत असला तर आपल्याला परावलंबी बनवत जातो. (Ways to overcome the habit of people pleasing)
दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यामुळे आपण आपल्यातील निर्णयक्षमता देखील गमावून बसतो आणि जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा फक्त पदरी निराशा येते. पण ज्यादिवशी आपण इतरांकडून अपेक्षा करणं थांबवून त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी कोणते ६ बदल आवश्यक आहेत, ते जाणून घेऊया. (Psychological tips)
सुरुवातीला काही छोट्या गोष्टींचे निर्णय स्वत: घ्यायला शिका. प्रत्येक वेळी दुसऱ्याला विचारणे थांबवा. जेव्हा आपण स्वत:चा निर्णय घेतो, तेव्हा त्यातून मिळणारा आत्मविश्वास आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार करतो.
अनेकांना एकटे पडण्याच्या भीतीमुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय असते. त्यासाठी दिवसातला काही वेळ स्वत:सोबत घालवा, एकटे फिरायला जा किंवा एखादा छंद जोपासा. स्वत:ची संगत एन्जॉय करायला शिकणं ही स्वावलंबनाची पहिली पायरी असते.
प्रत्येक आठवड्याला स्वत:ला एक नवीन आव्हान द्या. आपले पैसे कुठे खर्च होतात आणि कशी बचत करता येईल याचे नियोजन करा. जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू तेव्हा आपण स्वावलंबी बनतो.
कम्फर्ट झोनमध्ये राहण्याचे कारण म्हणजे 'चूक होण्याची भीती'. आपण हे केल आणि चुकलं तर अशी भावना सतत मनात राहते, त्यामुळे आपण पुढे जात नाही. पण माणूस नेहमीच चुकांमधून शिकतो. त्यासाठी नवीन गोष्टी करुन पाहा, अपयश आल्यावर सुद्धा आपण त्यातून काही ना काही शिकू शकतो.
आपण जितक्या जास्त गोष्टी शिकू तितकीच आपल्याला दुसऱ्याची गरज कमी भासेल. मग ते घरकाम असो, तंत्रज्ञान किंवा कामाच्या ठिकाणचे कौशल्य. नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपला स्वत:वरचा विश्वास वाढतो.