लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

Updated:April 30, 2026 11:55 IST2026-04-30T11:39:16+5:302026-04-30T11:55:33+5:30

Essential Safety Tips For Putting Babies to Sleep In Ac : एसीमुळे हवा कोरडी होते. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासठी झोपण्यापूर्वी मॉईश्चरायजर लावायला विसरू नका.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

लहान मुलांना एसीमध्ये झोपताना त्यांची त्वचा नाजूक असल्यानं आणि त्यांना लवकर थंडी वाजत असल्यानं काळजी घेणं आवश्यक आहे. (Essential Safety Tips For Putting Babies to Sleep In Ac)

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

एसीचे तापमान नेहमी २४ डिग्री सेल्सियस ते २६ डिग्री सेल्सियम दरम्यान ठेवा.खूप कमी तापमान मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. (How To Safely Use Air Conditioning For Your Little Ones)

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

मुलांचा पाळणा किंवा बेड अशा ठिकाणी ठेवा जिथे एसीची हवा थेट त्यांच्या अंगावर येणार नाही.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

मुलांना सुती पण पू्र्ण बाह्यांचे कपडे घाला. शक्य असल्यास हलके हातमोजे आणि पायमोजे देखील वापरा.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

झोपताना मुलांच्या अंगावर पातळ सुती चादर किंवा गोधडी नक्की घाला. ज्यामुळे त्यांचे शरीर थंड पडणार नाही. एसीमध्ये झोपणाऱ्या मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी दूध किंवा पाणी पाजत राहा.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

एसीमुळे हवा कोरडी होते. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासठी झोपण्यापूर्वी मॉईश्चरायजर लावायला विसरू नका.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

खोलीत खूप कोरडेपणा जाणवत असेल तर एका कोपर्‍या पाण्याचे भांडे उघडे ठेवावे. जेणेकरून हवेतील ओलावा टिकून राहील.

लहान मुलांना एसीत झोपवताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्य़था आजारी पडतील मुलं

एसीचे फिल्टर्स वेळोवेळी स्वच्छ करा. जेणेकरून मुलांना धूळ किंवा जंतूंमुळे श्वसनाचा त्रास होणार नाही. एसी रूममधून मुलाला थेट कडक उन्हात किंवा गरम वातावरणात नेऊ नका. नेण्यापूर्वी काही वेळ एसी बंद करून खोलीचे तापमान सामान्य होऊ द्या.