'महाभारत'च्या शिखंडीची कामासाठी परवड; 350 सिनेमा करुनही मिळाली नाही ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:12 IST2026-04-30T10:04:05+5:302026-04-30T10:12:13+5:30
kanwarjit paintal: त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, आज त्यांना इंडस्ट्रीत काम मिळणं कठीण झालं आहे.

'महाभारत'च्या शिखंडीची कामासाठी परवड; 350 सिनेमा करुनही मिळाली नाही ओळख
80 च्या दशकात तुफान लोकप्रिय झालेली पौराणिक मालिका म्हणजे महाभारत. आजही या मालिकेची क्रेझ कमी झालेली नाही. दुरदर्शनवर प्रसारित झालेली ही मालिका लोकाग्रहाखातर कित्येक वेळा टेलिव्हिजनवरही दाखवण्यात आली आहे. या मालिकेतील शिखंडीची भूमिका साकारणारा अभिनेता तुम्हाला आठवतो का? या अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमा, मालिका केल्या. परंतु, आज त्याच्यावर पुन्हा एकदा काम मागायची वेळ आली आहे
बी. आर. चोपडा यांच्या महाभारत या मालिकेत अभिनेता कंवरजीत पेंटल यांनी शिखंडीची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मात्र, त्याच कंवरजीत पेटंल यांना आज काम मिळणं कठीण झालं आहे. अलिकडेच अभिनेता मनमीत सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते कंवरजीत यांच्यासोबत चर्चा करतांना दिसत आहेत.
''तुम्ही अभिनेता आहात का?'' असा प्रश्न मनमीत यांनी कंवरजीत यांना विचारला. त्यावर ''नाही. मी अभिनेता नाही. कारण, इन्स्टाग्रामवर माझे कोणी फॉलोअर्स नाही. ज्यांचे फॉलोअर्स नसतात ते कलाकार नसतात'', असं उत्तर कंवरजीत यांनी दिलं.
दरम्यान, कंवरजीत यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ३५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, आज त्यांना इंडस्ट्रीत काम मिळणं कठीण झालं आहे.