लिंबाचा रस काढून साल फेकू नका, करा गोड आंबट लोणचं- घ्या अगदी सोपी पौष्टिक रेसिपी
Updated:April 29, 2026 16:17 IST2026-04-29T16:06:59+5:302026-04-29T16:17:37+5:30

जेव्हा आपण स्वयंपाकात किंवा सरबतासाठी लिंबू वापरतो तेव्हा त्याचा रस पिळून घेतो आणि सालं मात्र टाकून देतो. पण त्या सालांचं खूप चटपटीत लोणचं घालता येतं आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने.
लिंबाचा रस जेवढा पौैष्टिक असतो तेवढेच गुणधर्म त्याच्या सालांमध्येही असतात. त्यामुळे लिंबाचं लोणचं नेहमी सालांसकटच खावं असं सांगितलं जातं. त्यामुळेच आता त्या सालांचच लोणचं कसं घालायचं ते पाहूया...
यासाठी साधारण २०० ते २५० ग्रॅम एवढी काचेची बरणी घ्या. त्या बरणीमध्ये अर्धी वाटी साखर घाला.
आता त्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा काळं मीठ घाला.
चवीसाठी थोडी जिरेपूड, ओवा आणि लाल तिखटही घालू शकता.
आता तुमच्याकडे लिंबाचा रस पिळल्यानंतर ज्या काही लिंबाच्या साली जमा होत जातील त्या या बरणीत टाकत चला आणि रोज बरणी एकदा वर- खाली या पद्धतीने हलवून घ्या.
काही दिवसांतच चटपटीत लोणचं तयार.... हे लोणचं अगदी ८ ते १० महिनेही चांगलं टिकतं. त्यासाठी कोणताही वेगळा मसाला वापरावा लागत नाही. एकदा करून पाहा.