नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय 'हा' चित्रपट, 'धुरंधर'लाही टाकलं मागे; तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:29 IST2026-04-29T16:28:48+5:302026-04-29T16:29:09+5:30
कमी कालावधी आणि खिळवून ठेवणारे कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय 'हा' चित्रपट, 'धुरंधर'लाही टाकलं मागे; तुम्ही पाहिला का?
Netflix Trending Movie : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. प्रेक्षक पसंतीमुळे चित्रपट आणि वेबसीरिज अल्पावधीत ट्रेंडसुद्धा होतात. अशातच एका चित्रपटाची ओटीटीवर चर्चा सुरू आहे. एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
तर या चित्रपटाचं नाव आहे 'एपेक्स' (Apex). १ तास ३५ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'एपेक्स'नं नेटफ्लिक्सवर इतर ९ भारतीय चित्रपटांना मागे टाकत नंबर वन ट्रेंडिंग'चा किताब पटकावला आहे. 'उस्ताद भगत सिंग', 'मर्दानी ३', 'धुरंधर', 'टोस्टर' आणि 'दो दीवाने शहर में' सारख्या बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपटांनाही 'एपेक्स'नं लोकप्रियतेच्या शर्यतीत मागे टाकले.
काय आहे 'एपेक्स'ची कथा?
हा एक हाय-व्होल्टेज सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका धाडसी रॉक क्लायंबरभोवती (शार्लिझ थेरॉन) फिरते. जंगलात गिर्यारोहण करत असताना ती अचानक काही धोकादायक शिकाऱ्यांच्या तावडीत सापडते. एक क्रूर शिकारी तिचा जीव घेण्यासाठी जंगलात पाठलाग करतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती करत असलेला संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. कमी कालावधी आणि खिळवून ठेवणारे कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.