सिगरेट ओढणाऱ्याच्या खिशाला १ मे पासून मोठा कात्री लागणार आहे. मे महिन्यापासून सिगारेच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्स यांसारख्या दिग्गज कंपन्या सिगरेटच्या किमतीत तब्बल १७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र, या दरवाढीच्या वृत्ताने आज शेअर बाजारात सिगरेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये तबरदस्त तेजी दिसून येत आहे. कंपन्यांचे शेअर ८.५ टक्क्यांपर्यंत वधारल्याचे दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, मे महिन्यात 'गोल्डफ्लेक प्रीमियम'चा दर ११५ रुपयांवरून १३५ रुपयांपर्यंत वाढू शकतो. तत्पूर्वी, यावर्षी केंद्र सरकारने सिगरेटवरील करात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली. यानतर आता कंपन्यांकडून दरवाढ केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू केलेल्या अधिसूचनेनुसार, १००० सिगरेट स्टिक्सवर त्यांच्या लांबीनुसार २०५० रुपये ते ८५०० रुपयांपर्यंत एक्साईज ड्युटी आकारली जात आहे.
गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअरमध्येही ८.५ टक्क्यांची जबरदस्त तेजी -
या दरवाढीच्या वृत्तांनंतर, बुधवारी सिगरेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. आयटीसीचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वधारला आणि ३०५.१० वरून ३१७.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर दसरीकडे, गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअरमध्येही ८.५ टक्क्यांची जबरदस्त तेजी दिसून आली. हा शेअर २१३८.५० रुपयांवरून २२९८ रुपयांपर्यंत पोहोचला.
गॉडफ्रे फिलिप्सनं दिला ६८२ टक्क्यांचा परतावा -
महत्वाचे म्हणजे, गॉडफ्रे फिलिप्सनेच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ६८२ टक्क्यांपर्यंत नफा दिला आहे. याशिवाय, आयटीसीच्या शेअरने गेल्या एका महिन्यात ७ टक्क्यांहून अधिक तर पाच वर्षांत ६३ टक्के एवढा नफा दिला आहे.
