मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:29 IST2026-04-29T15:21:07+5:302026-04-29T15:29:00+5:30

मागील काही दिवसापासून विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती.

Big news Ambadas Danve will go to the Legislative Council from the Thackeray group. | मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा

मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी अधिकृतपणे या उमेदवारीची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरावा, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, ठाकरे गटाने पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीकडे नऊ जागा असून महाविकास आघाडीला एक जागा येत आहे. यामध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली आहे. दरम्यान, काल भाजपानेही पाच जागांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची असून, त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेची आमदारकी कोणाला देणार या चर्चा सुरू आहेत.

भाजपाने या नेत्यांना दिली उमेदवारी

विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने मंगळवारी जारी केलेल्या या यादीत, सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे.

Web Title : उद्धव ठाकरे चुनाव नहीं लड़ेंगे; अंबादास दानवे शिवसेना का प्रतिनिधित्व करेंगे

Web Summary : उद्धव ठाकरे आगामी विधान परिषद चुनाव नहीं लड़ेंगे। आदित्य ठाकरे ने घोषणा की कि शिवसेना (यूबीटी) ने अंबादास दानवे को नामांकित किया है। सहयोगी कांग्रेस और एनसीपी (शरदचंद्र पवार) ने ठाकरे से चुनाव लड़ने का आग्रह किया, लेकिन पार्टी ने दानवे में अपना विश्वास दोहराया।

Web Title : Uddhav Thackeray Not Contesting; Ambadadas Danve to Represent Shiv Sena

Web Summary : Uddhav Thackeray will not contest the upcoming Legislative Council elections. Shiv Sena (UBT) has nominated Ambadadas Danve, as announced by Aaditya Thackeray. Allies Congress and NCP (Sharadchandra Pawar) urged Thackeray to run, but the party reaffirmed its confidence in Danve.