उन्हाळ्यात किचनमध्ये शिरताच घामाच्या धारा? गॅससमोर तासनतास उभं न राहता करा खास रेसिपी, १० मिनिटांत स्वयंपाक तयार
Updated:April 29, 2026 16:55 IST2026-04-29T16:51:33+5:302026-04-29T16:55:03+5:30
15 minute healthy Indian summer breakfast: No-cook or quick-cook summer dinner ideas: पाहूयात उन्हाळ्यात पोटाला शांत करणारे आणि झटपट होणाऱ्या काही सोप्या रेसिपी.

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला किचनमध्ये जाणं कठीण होतं. बाहेर सूर्याचा कडाका आणि आत गॅसची उष्णता, या दुहेरी मारामुळे गृहिणींच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. तासनतास गॅससमोर उभं राहून फोडण्या देणं, भाजी-पोळीचा बेत आखणं हे उन्हाळ्यात खूपच थकवणारं ठरतं.(15 minute healthy Indian summer breakfast)
उन्हाळ्यात आपल्याला अशा रेसिपीची गरज असते ज्या केवळ १० ते १५ मिनिटांत तयार होतील आणि शरीराला थंडावा देतील. तांदळाचे झटपट होणारे प्रकार, पौष्टिक कोशिंबिरी आणि दह्याचा वापर केलेले पदार्थ उन्हाळ्यासाठी वरदान ठरतात. पाहूयात उन्हाळ्यात पोटाला शांत करणारे आणि झटपट होणाऱ्या काही सोप्या रेसिपी. (No-cook or quick-cook summer dinner ideas)
थंडगार दही पोहे बनवण्यासाठी आपल्याला पोहे धुवून त्यात फेटलेले दही, चवीनुसार मीठ, साखर आणि थोडी हिरवी मिरची घाला. वरून जिरे-मोहरीची फोडणी द्या. हा पदार्थ ५ मिनिटांत तयार होतो आणि पोटाला थंडावा देतो.
वन पॉट खिचडीमध्ये आपण डाळ, तांदूळ आणि विविध भाज्या, मसाले घालून ही खिचडी बनवू शकतो. यासाठी आपल्याला गॅससमोर सतत उभं राहण्याची गरजही नाही.
रात्रीचा उरलेला भात असेल तर त्यात काकडी, गाजर, टोमॅटो किंवा दही घालून व्हेजिटेबल राईता आणि पुलाव करु शकता. ही 'वन डिश मील' उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे.
रवा आणि दही एकत्र भिजवून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला. तव्यावर झटपट उत्तपे करु शकता. हे पचायला हलके आणि बनवायला सोपे आहेत.
खूपच गरम होत असेल आणि हलके-फुलके खावेसे वाटत असेल तर जड पदार्थांऐवजी मूग डाळीचे कढण किंवा ताकाची कढी आणि सोबत भरपूर काकडीची कोशिंबीर घ्या.