'जी ले जरा'च्या कास्टिंगमध्ये बदल? फरहान अख्तरने केलं स्पष्ट; म्हणाला, "बऱ्याच अडथळ्यांमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:52 IST2026-04-29T16:51:51+5:302026-04-29T16:52:34+5:30

'जी ले जरा' सिनेमा येणार की नाही?

farhan akhtar gives update on zee le jara starring priyanka chopra katrina kaif and alia bhatt did casting changed know what he says | 'जी ले जरा'च्या कास्टिंगमध्ये बदल? फरहान अख्तरने केलं स्पष्ट; म्हणाला, "बऱ्याच अडथळ्यांमुळे..."

'जी ले जरा'च्या कास्टिंगमध्ये बदल? फरहान अख्तरने केलं स्पष्ट; म्हणाला, "बऱ्याच अडथळ्यांमुळे..."

प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या तीनही दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणणारा दिग्दर्शक फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा नक्की येणार की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. २०११ मधील 'डॉन २' नंतर फरहान या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात परतणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, तारखांच्या समस्येमुळे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. तर आता चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर फरहानने उत्तर दिलं आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फरहानने या अनिश्चिततेवर आपले मौन सोडले आहे. तो म्हणाला की, "या सगळ्यामागे एक अनाकलनीय परिस्थिती आहे. मी हे शब्दात सांगू शकत नाही पण मला हे करायचंय. हा असा अनुभव आहे जो मी घेतला नाही तर मी आयुष्यात काहीतरी गमावलंय असंच मला वाटत राहील. गेल्या साडेचार वर्षांपासून दिग्दर्शक म्हणून मी सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करतोय पण काही ना काही कारणाने एक एक चाक निखळून पडत आहे. पण तरीही मी हा सिनेमा करण्यासाठी उत्सुक आहे. मला असं वाटतंय युनिव्हर्स जणू माझी परीक्षाच घेत आहे. त्यामुळे आता मी त्या शेवटच्या अडथळ्यावर मात करत सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्याची वाट पाहत आहे."

'जी ले जरा'च्या कास्टिंगमध्ये बदल झाले का? यावर फरहान म्हणाला, "सध्या अनेक गोष्टींबाबत खूप अफवा पसरत आहेत. मी नेहमीच या मतावर ठाम राहिलो आहे की, चित्रपट बनवताना मला कोणतीही गोष्ट गुपित ठेवायला आवडत नाही. जेव्हा कधी मला असे वाटते की एखादी गोष्ट जगासमोर मांडण्यासाठी तयार आहे, तेव्हा मी ती सर्वांसोबत शेअर केली आहे. यावेळीही मी तसेच करेन. सध्या मी अशा स्थितीत आहे जिथे मला एक दिग्दर्शक म्हणून माझे पुढचे पाऊल काय असावे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्यामुळे मला थोडा वेळ थांबून माझे मन नेमके कशात आहे हे पाहणं आवश्यक वाटतं. त्यामुळे, एकदा का हे स्पष्ट झाले की मी स्वतः जगाला त्याबद्दल माहिती देईन."

Web Title : 'जी ले जरा' कास्टिंग में बदलाव? फरहान अख्तर ने दी सफाई, बताई देरी।

Web Summary : फरहान अख्तर ने 'जी ले जरा' को लेकर अनिश्चितता पर बात की, शेड्यूल और तकनीकी दिक्कतों से हो रही देरी बताई। कास्टिंग में बदलाव की अफवाहों का खंडन किया, फैसले होने पर पारदर्शिता का वादा किया। अख्तर ने चुनौतियों के बावजूद प्रतिबद्धता जताई।

Web Title : 'Jee Le Zaraa' Casting Changes? Farhan Akhtar Clarifies Delays, Obstacles.

Web Summary : Farhan Akhtar addresses uncertainty around 'Jee Le Zaraa,' citing scheduling conflicts and technical issues delaying production. He denies casting changes amidst rumors, promising transparency when decisions are finalized. Akhtar emphasizes his commitment despite ongoing challenges.