'मला घटस्फोटित नवराच हवा होता" अपूर्वा नेमळेकरने का ठेवलेली 'ही' अट, खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:38 IST2026-04-29T16:37:52+5:302026-04-29T16:38:03+5:30

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने घटस्फोटित नवरा का हवा होता? यामागचं कारण सांगितलं.

Apoorva Nemlekar Wanted A Divorcee Husband Reveals Reason Praises Husband Anuj Marathi News | 'मला घटस्फोटित नवराच हवा होता" अपूर्वा नेमळेकरने का ठेवलेली 'ही' अट, खुलासा करत म्हणाली...

'मला घटस्फोटित नवराच हवा होता" अपूर्वा नेमळेकरने का ठेवलेली 'ही' अट, खुलासा करत म्हणाली...

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर. 'रात्रीस खेळ चाले', 'आभास हा',' प्रेमाची गोष्ट' अशा लोकप्रिय मालिकांमधून अपूर्वाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलिकडेच अपूर्वाने १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेचं औचित्य साधत तनुज गोवळकरबरोबर लग्नगाठ बांधली. अपूर्वाची लग्न करताना 'घटस्फोटीतच मुलगा हवा' अशी अट होती. या अटीमागचं कारण काय होतं? याचा खुलासा अभिनेत्रीनं केलाय.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा नेमळेकर म्हणाली, ठमाझा पहिला विचार हा होता की माझा जोडीदार मराठी असावा आणि तो 'घटस्फोटित' (डिव्होर्सी) असावा. मला अशा अनेक मुलांनी लग्नासाठी विचारले ज्यांचे आधी लग्न झाले नव्हते. ते म्हणायचे की आम्ही तुला स्वीकारायला तयार आहोत, आपण भेटूया का? पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला.  यामागे माझा एक स्पष्ट विचार होता, ज्या व्यक्तीने आयुष्यात त्या दुःखाची चवच घेतलेली नाही, त्याला माझ्या भावना समजणार नाहीत. मला अचानक रडू आलं, एखाद्या छोट्या गोष्टीने मी भावुक झाले, तर त्याला ते कळणार नाही. कदाचित त्याला मी वेडी वाटेन किंवा मी ओव्हरथिंक करतेय असं वाटेल".

पती तनुजबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, "तनुज माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतो. तो चॉकलेट खातानाही माझ्यासाठी अर्धा भाग राखून ठेवतो. हे जगासाठी हास्यास्पद असेल, पण माझ्यासाठी खूप मोठं आहे. कारण मला याआधी कधीच अशा प्रकारचं प्रेम आणि काळजी मिळाली नव्हती. त्याच्या या वागण्यामुळे मी अनेकदा त्याच्यासमोर रडले आहे. सुरुवातीला हे प्रेम स्वीकारणं माझ्यासाठी कठीण होतं".

अपूर्वा आपल्या भूतकाळातील संघर्षावर बोलताना म्हणाली, "मी कोणत्याही नात्यात घाईघाईने पडले नाही किंवा 'एक्सपेरिमेंट' केले नाहीत. मी शांतपणे योग्य व्यक्तीची वाट पाहिली. या प्रवासात मी चिडचिडी झाले होते, कधी कधी इतर सुखी लोकांचा रागही यायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. एक काळ असा होता की मी कारमध्ये बसून एकटी ढसाढसा रडायचे, पण तनुज आयुष्यात आल्यावर माझं ते रडणं आता कायमचं थांबलं आहे".


Web Title : अपूर्वा नेमलेकर ने बताया कि उन्हें तलाकशुदा पति ही क्यों चाहिए था।

Web Summary : अपूर्वा नेमलेकर ने तनुज गोवलकर से शादी की, और खुलासा किया कि उनकी शर्त केवल एक तलाकशुदा आदमी से शादी करना था। वह एक ऐसा साथी चाहती थी जो पिछली अनुभवों के दर्द और भावनाओं को समझ सके, सहानुभूति प्रदान करे और उनके रिश्ते में संभावित गलतफहमी को रोके।

Web Title : Apurva Nemlekar reveals why she wanted a divorced husband.

Web Summary : Apurva Nemlekar married Tanuj Gowlkar, revealing her condition to marry only a divorced man. She wanted a partner who understands the pain and emotions of past experiences, offering empathy and preventing potential misunderstandings in their relationship.