'मलेरिया झालेला असतांनाही ती काम करत होती'; लारा दत्ताने केलं दीपिका पदुकोणच्या प्रोफेशनलिज्मचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:07 IST2026-04-30T10:06:42+5:302026-04-30T11:07:48+5:30

Lara Dutta: हाऊसफूल सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज होऊन १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने लारा दत्ताने सिनेमाशी निगडीत आठवणी शेअर केल्या.

lara-dutta-tells-deepika-padukone-kept-shooting-for-housefull-despite-getting-malaria | 'मलेरिया झालेला असतांनाही ती काम करत होती'; लारा दत्ताने केलं दीपिका पदुकोणच्या प्रोफेशनलिज्मचं कौतुक

'मलेरिया झालेला असतांनाही ती काम करत होती'; लारा दत्ताने केलं दीपिका पदुकोणच्या प्रोफेशनलिज्मचं कौतुक

२०१० मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफूल या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आतापर्यंत या फ्रेंचायजीमधील जवळपास ५ सिनेमा रिलीज झाले आहेत. साजिद खान यांचा हाऊसफूल सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज होऊन नुकतीच १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) हिने नुकत्याच काही सिनेमाशी निगडीत आठवणी शेअर केल्या.

अलिकडेच लाराने एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने हाऊसफूल सिनेमाची आठवण सांगत असतांना अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone)  कामाचं कौतुक केलं. या सिनेमाचं शुटिंग सुरु असतांना दीपिकाला मलेरिया झाला होता. मात्र, तरीदेखील ती सातत्याने काम करत होती.

''या सिनेमाचं इटलीमध्ये शुटिंग सुरु होतं आणि आम्ही सगळेच जण एक कुटुंब असल्यासारखं एकत्र रहात होतो. साजिद नाडियादवालाने सेटवर तसंच घरच्या सारखं वातावरण निर्माण केलं होतं. आम्ही सगळेच जण छान एकत्र रहात होतो. ज्यावेळी प्रोडक्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय नीट चालतं त्यावेळी सगळे प्रॉब्लेम्सही आपोआप सुटतात'', असं लारा म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''हाऊसफूलचं शुटिंग सुरु असतांना दीपिकाला मलेरिया झाला होता हे फार कमी जणांना माहित आहे. मलेरियामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता. तिला डॉक्टरांकडे सतत जावं लागत होतं, औषध सुरु होती. पण, दीपिका एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. रात्रभर तिला ताप होता, अशक्तपणामुळे ती थरथर कापत होती. परंतु, तरी सुद्धा औषध घेऊन ती सकाळी सेटवर शुटिंगसाठी तयार असायची. फक्त इतकंच नाही तर आजारी असतांनाही तिने उत्तमरित्या तिची भूमिका पार पाडली. आजारपणाचं कारण पुढे देत तिने जराही कामात हलगर्जीपणा दाखवला नाही. प्रामाणिकपणे तिने तिचं काम केलं.''

दरम्यान, साजिद खानच्या हाऊसफूलमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पदुकोण आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात बोमन इराणी, अर्जुन रामपाल, लिलेट दुबे हे कलाकारही झळकले होते.

Web Title : मलेरिया में भी दीपिका का काम, लारा दत्ता ने की तारीफ

Web Summary : लारा दत्ता ने 'हाउसफुल' की शूटिंग के दौरान दीपिका पादुकोण के पेशेवर रवैये की प्रशंसा की। मलेरिया से पीड़ित होने के बावजूद, दीपिका ने लगन से काम करना जारी रखा, और अपने प्रदर्शन से कभी समझौता नहीं किया। उनके समर्पण ने पूरे क्रू को प्रभावित किया।

Web Title : Despite malaria, Deepika Padukone's professionalism lauded by Lara Dutta.

Web Summary : Lara Dutta praised Deepika Padukone's professionalism during 'Housefull' shoot. Despite suffering from malaria, Deepika continued working diligently, never compromising on her performance. Her dedication impressed the entire crew.