मिलिंद गवळींनी रुपाली गांगुलींच्या पार्टीला लावली हजेरी, सोबतीला त्यांचा जावई; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:04 IST2026-05-01T18:03:57+5:302026-05-01T18:04:31+5:30
मिलिंद गवळींनी लिहिली लांबलचक पोस्ट

मिलिंद गवळींनी रुपाली गांगुलींच्या पार्टीला लावली हजेरी, सोबतीला त्यांचा जावई; म्हणाले...
मराठी अभिनेते मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. यापूर्वी त्यांनी कित्येक मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारली. 'आई कुठे काय करते' मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली. नुकतंच ते अनुपमा फेम रुपाली गांगुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा जावईही होता. कोण आहे मिलिंद गवळींचा जावई?
मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. रुपाली गांगुली यांच्या पार्टीतील अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, "काल रूपाली गांगुली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहारा स्टार येथे त्यांच्या पार्टीला मी आणि माझा जावई दिग्विजय कदम आम्ही दोघे गेलो. सहसा मी पार्टीला जायचं टाळतो, पण कोणी खूपच प्रेमाने, आदराने आग्रह करून आमंत्रण दिलं तर मग मी जायचं टाळतही नाही,
आणि रूपाली गांगुली यांच्या आईसाहेब त्या इतक्या गोड आणि प्रेमळ आहेत. ते आवर्जून माझ्या सगळ्या मालिका बघतात आणि माझं पोट भरून कौतुक करत असतात, काल त्यांना भेटायचा मोह पण होताच. माझ्या जावयाची मी ओळख करून दिली तर आईसाहेब म्हणाल्या, "जावयाचा आदर सत्कार केल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही".
"काल राजनशाही पण भेटले, माझा जावई सिरम कंपनीमध्ये कामाला आहे ही गोष्ट इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या लक्षात होती. राजनजींनी मला सुमंताजी बोस जे आमच्या स्टार वाहिनीचे मुख्य आहेत, यांच्याकडे मराठी, गुजराती, बंगाली, स्टारप्लस, स्टारभारत चे मुख्य आहेत. यांची सुद्धा माझ्याशी ओळख करून दिली. ते मला भेटून म्हणाले "I know you played Vanraj Character in Marathi , you are good Actor" तसंच काल रोमेश कारला जी आणि त्यांचा परिवार भेटला, "आई कुठे काय करते" ते विवेक जैन तेही भेटले, हे सगळे इतके मोठे लोक आहेत जे प्रत्येकी दोनशे पाचशे कुटुंब चे घरं चालवतात. ज्यांच्या एका शब्दावर आमच्या मालिका उभ्या राहतात, रूपाली गांगुली च्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेमळ आई, हसमुख पतीची भेट झाली. रूपाली गांगुली यांची "अनुपमा" मालिका ही "आई कुठे काय करते", वरून घेतली आहे पण ती आजही सुरू आहे, त्याचं श्रेय रूपाली गांगुली यांच्या Talent, Passion आणि Hardwork ला जातं. राजनशाहींसारखे निर्माते आम्हालाही लाभले होते, पण आमच्यामध्यलं Passion, Hardwork कामाविषयीचा प्रामाणिकपणा कमी पडला बहुतेक. आज इतका चांगला, मोठा प्रोडूसर पुन्हा मराठी करायला तयार नाही. रूपाली गांगुली ला तिच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा."