३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:51 IST2026-05-01T17:47:00+5:302026-05-01T17:51:41+5:30

UAE News: संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.

leave 3 countries immediately united arab emirates uae warning to citizens is this cautionary warning or war | ३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?

३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?

UAE News: अमेरिका आणि इराण युद्ध नवनवीन वळणे घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. 'होर्मुझची सामुद्रधुनी' इराणच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी योजना सादर केली आहे. या योजनेत इराणच्या बंदरांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. यातच संयुक्त अरब अमिराती यांनी आपल्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, तीन देशांतून तातडीने बाहेर पडण्याचे आणि या देशांमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे. 

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला असून, दोन्ही देशांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या अधूनमधून शाब्दिक चकमकींमुळे या शांतता चर्चांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या सर्व अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आपल्या नागरिकांना इराण, इराक आणि लेबनॉनला प्रवास करण्यावर तात्काळ बंदी घातली आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात, संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता, संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांसाठी इराण, इराक आणि लेबनॉनच्या प्रवासावर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, या देशांमध्ये आधीपासूनच असलेल्या आपल्या नागरिकांसाठीही संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना तात्काळ आपापल्या देशात परतण्याचे आवाहन करणारी सूचना जारी केली आहे. 

दरम्यान, अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची प्रमुख संघटना असलेल्या 'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज' (ओपेक) मधून बाहेर पडण्याची घोषणाही केली होती. संयुक्त अरब अमिरातीचे ओपेकमधून बाहेर पडणे हा इराणसाठी एक धक्का मानला जात होता. 

 

Web Title : यूएई ने नागरिकों को ईरान, इराक और लेबनान से तुरंत निकलने की सलाह दी।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, यूएई ने अपने नागरिकों को तुरंत ईरान, इराक और लेबनान छोड़ने का आग्रह किया है, साथ ही इन देशों की यात्रा पर प्रतिबंध लगा दिया है। यूएई के विदेश मंत्रालय ने मौजूदा परिस्थितियों को इस सलाह का कारण बताया है।

Web Title : UAE advises citizens to urgently leave Iran, Iraq, and Lebanon.

Web Summary : Amid US-Iran tensions, the UAE has urged its citizens to immediately leave Iran, Iraq, and Lebanon, also banning travel to these nations. The UAE's foreign ministry cited current circumstances as the reason for this advisory, adding to regional uncertainties.