धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:12 IST2026-05-01T17:11:12+5:302026-05-01T17:12:32+5:30

Sakoli Accident : बस चालकाने प्रसंगावधान राखत काही क्षणापूर्वीच बस थांबविल्याने मोठा अपघात टळला.

A wheel of a running bus came off, a major accident was averted near Sakoli! | धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!

धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!

नागपूर : नागपूरहून देवरीकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवासी बसचे चाक बाहेर निघाले. बस चालकाने प्रसंगावधान राखत काही क्षणापूर्वीच बस थांबविल्याने मोठा अपघात टळला. शुक्रवारी सकाळी १०:२० वाजता हा अपघात साकोलीजवळ घडला. 

येथील गणेशपेठ आगाराची बस क्रमांक एमएच ०६ / बीडब्ल्यू  ०८११ आज सकाळी नागपूरहून देवरीकडे निघाली. बस मध्ये ३६ प्रवासी होते. चालक म्हणून निखिल तांबेकर आणि वाहक म्हणून स्वीटी निखाडे कर्तव्यावर होते. ही बस साकोली आगाराच्या एक किलोमीटर आधी आली असताना बसच्या मागच्या डाव्या बाजूच्या चाकाचे व्हीलनट ढीले होऊन पडल्यामुळे चाक बसच्या बाहेर जाऊन पडले. 

दरम्यान, संतुलन बिघडल्याने बसच्या मागच्या चाकात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यामुळे बस चालकाने ब्रेक दाबून बस रस्त्याच्या बाजूला  थांबविली. त्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, बसचे चाक बाहेर निघून दूर जाऊन पडल्याने खडखडाट झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बस चालक आणि वाहकाने बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. या घटनेची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर साकोली आगारातून मदत पाठविण्यात आली. 

एसटीच्या देखभालीचा मुद्दा ऐरणीवर

अपघातात कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, बसचे चक्क चाकच बाजूला निघाल्याने एसटी महामंडळाच्या बसची देखभाल कशा पद्धतीने होते, हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. हा दोष कुणाचा, त्याची चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title : साकोली के पास बस का पहिया निकला; बड़ा हादसा टला

Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन की एक बस का साकोली के पास पहिया ढीले नटों के कारण निकल गया। सतर्क ड्राइवर ने बस को रोक दिया, जिससे एक बड़ा हादसा टल गया। सभी 36 यात्री सुरक्षित थे। घटना बस रखरखाव पर चिंता जताती है।

Web Title : Bus Wheel Detaches Near Sakoli; Major Accident Averted

Web Summary : A Maharashtra State Transport bus lost a wheel near Sakoli due to loose wheel nuts. The alert driver stopped the bus, preventing a major accident. All 36 passengers were safe. The incident raises concerns about bus maintenance.