“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 19:17 IST2026-05-01T19:15:44+5:302026-05-01T19:17:30+5:30

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

congress harshwardhan sapkal criticized that attempts to reduce maharashtra political importance govt should introspect | “महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ

“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन सपकाळ यांनी राज्याच्या पुरोगामी वारशावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेली ही भूमी, वारकरी संप्रदायाने दिलेली समतेची शिकवण आणि आपल्या मायबोली मराठीचा अभिमान या सर्वांची जपणूक करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्रात समाजात फूट पाडण्याचे, जाती-धर्मांत भांडण लावण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची ओळख आणि अस्मिता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान सुरू आहेत. डी-लिमिटेशनसारख्या प्रक्रियांद्वारे महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा वरवर दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताला धक्का देणारे निर्णय घेतले जात आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली. 

महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू 

महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरू आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मिसिंग लिंकच्या नावाखाली राजकारण केले जात आहे; पण प्रत्यक्षात कायदा-सुव्यवस्था, प्रशासन, महिलांची सुरक्षा, दुष्काळ व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाई या सगळ्याच ठिकाणी ‘मिसिंग लिंक’ दिसते. सरकारने आत्मपरीक्षण करून ही तूट भरून काढावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आमचे गठबंधन भक्कम आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या भावनेने आम्ही पुढे जात आहोत. आगामी काळात संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस नेतृत्वाची भूमिका बजावेल. राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मोठी शक्ती आहे, आणि राज्यात काँग्रेसला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, ही आमची भूमिका आहे, ज्याला सहयोगी पक्षांनीही मान्यता दिली आहे, असे सांगत, बच्चू कडू यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, बच्चू कडू यांच्या फोन प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. मात्र सत्य समोर आणण्याऐवजी सरकार गप्प बसलेले दिसत आहे. 

 

Web Title : महाराष्ट्र का राजनीतिक महत्व कम हो रहा: सरकार आत्मनिरीक्षण करे: सपकाल

Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने सरकार पर विभाजनकारी राजनीति और नीतियों के माध्यम से महाराष्ट्र की पहचान और राजनीतिक शक्ति को कमजोर करने का आरोप लगाया। उन्होंने कानून व्यवस्था, महिलाओं की सुरक्षा और सूखा प्रबंधन जैसे मुद्दों पर आत्मनिरीक्षण का आह्वान किया। सपकाल ने गठबंधन की ताकत पर भी बात की और बच्चू कडू फोन टैपिंग आरोपों की जांच की मांग की।

Web Title : Maharashtra's Political Importance Diminishing: Sapkal Urges Government to Introspect

Web Summary : Harswardhan Sapkal accuses the government of undermining Maharashtra's identity and political power through divisive politics and policies. He calls for introspection on issues like law and order, women's safety, and drought management. Sapkal also addressed coalition strength and demanded investigation into the Bachchu Kadu phone tapping allegations.