नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 20:47 IST2026-05-01T20:36:52+5:302026-05-01T20:47:43+5:30

मे महिन्याचा आगामी काळात अनेक शुभ राजयोग जुळून येत आहे. अनेक राशींना हा कालावधी अनपेक्षित परिणाम देणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मे महिन्याचा हा आगामी आठवडा खूप विशेष असणार आहे. या आठवड्यातील ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, बुध आणि सूर्य मेष राशीत युतीत आहेत, ज्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. शुक्र वृषभ राशीत राहून मालव्य आणि विपरीत राजयोग तयार करत आहे.

शनि आणि मंगळ मीन राशीत, राहु कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, तर गुरू मिथुन राशीत असेल. गुरू आणि राहु यांचा नवमपंचम राजयोग जुळून येत आहे. चंद्र वृश्चिक, धनु आणि मकर राशीत गोचर करेल.

ग्रहांच्या अशा स्थितीमुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. नवपंचम, बुधादित्य, मालव्य, विपरीत राजयोग हे या कालावधीचे वैशिष्ट्य असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: काही अडचणी येऊ शकतात, पण कालांतराने यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात यश प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना अनेक नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. वैयक्तिक प्रकरणे किंवा योजना गुप्त ठेवाव्यात, जे फायदेशीर ठरू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृषभ: करिअरच्या बाबतीत खूप सकारात्मक आणि प्रगतीसाठी प्रेरक काळ ठरू शकेल. भागीदारीमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळू शकतो. प्रेम जीवनाच्या बाबतीत, संयमाने घेतलेले निर्णय जीवनात शांतता आणतील. जोडीदार खूप खूश असेल. सुख आणि समृद्धीच्या संधी मिळतील. पण कामाच्या ठिकाणी अधिक पैसा खर्च होऊ शकते.

मिथुन: अनेक आनंदाचे क्षण अनुभवू शकाल. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होऊ शकते. हा काळ नोकरदार लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरीत बढती आणि पगारवाढीची शक्यता आहे. अविवाहित लोकांना चांगली स्थळे येऊ शकतात. व्यावसायिकांनी आखलेली रणनीती प्रभावी ठरू शकते.

कर्क: मान-सन्मान, संपत्ती मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात लक्षणीय लाभ मिळू शकतो. नवीन काम किंवा नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नेतृत्व क्षमतेतही वाढ होऊ शकते. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. घराची सजावट, वाहने, मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक करू शकता. विशेषतः मीडिया आणि परदेशाशी संबंधित कामांमध्ये लाभ मिळू शकतात. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

कन्या: नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकाल. सर्जनशीलता वाढेल. उत्साह आणि नेतृत्व क्षमता वाढू शकते. अनावश्यक खर्च होऊ शकतो. परदेश प्रवासात किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायांमध्ये नफा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या पाठिंब्याने व्यवसाय सुरू करणे यशस्वी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला असणार आहे. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळू शकते. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. शत्रूंवर विजय मिळवू शकाल. धन आणि सुखसोयींमध्ये वेगाने वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले अडथळे किंवा विरोध आता दूर होऊ शकतात.

मकर: हा अत्यंत शुभ काळ ठरू शकेल. जीवनात सुख आणि शांतता वाढू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात सलोखा टिकून राहील. सुखात वाढ होऊ शकते. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्थिरता टिकून राहील.

कुंभ: हा काळ अनेक प्रकारे विशेष असू शकतो. राहू आणि नवपंचम राजयोग वाढीव मान-सन्मान आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. कार्यक्षेत्रात यश आणि प्रगतीच्या चांगला संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यवसायात नवीन संधी किंवा ऑर्डर्स उपलब्ध होऊ शकतात. याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मीन: हा काळ कामात यश आणि प्रगती घेऊन येईल. करिअरमध्ये वेगाने प्रगती कराल. खूप आनंद मिळेल. पार्टी करण्याच्या मूडमध्ये असाल. मित्रांसोबत खूप आनंददायी वेळ घालवाल. प्रवासात यश मिळण्याची शक्यता आहे. परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त असेल, परंतु उत्पन्नही नियमित राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.