"राणी सईबाई आणि महाराजांचा तो सीन पाहून मी रडले...", 'राजा शिवाजी' पाहून रितेश देशमुखच्या वहिनीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:24 IST2026-05-01T16:23:43+5:302026-05-01T16:24:00+5:30

'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर रितेशची वहिनी दीपशिखाने पोस्ट शेअर केली आहे. सिनेमा पाहून रडल्याचं तिने म्हटलं आहे.

raja shivaji movie deepshikha deshmukh said i cry while watching movie praised genelia and ritesh deshmukh | "राणी सईबाई आणि महाराजांचा तो सीन पाहून मी रडले...", 'राजा शिवाजी' पाहून रितेश देशमुखच्या वहिनीची पोस्ट

"राणी सईबाई आणि महाराजांचा तो सीन पाहून मी रडले...", 'राजा शिवाजी' पाहून रितेश देशमुखच्या वहिनीची पोस्ट

Raja Shivaji Movie: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा आज १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठीतील शिवरायांवर बनणारा हा पहिलाच भव्य सिनेमा आहे. ज्याचं बजेट १०० कोटी इतकं आहे. 'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुख आणि वहिनी दीपशिखा देशमुख यांनीही सिनेमा पाहिला. 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर रितेशची वहिनी दीपशिखाने पोस्ट शेअर केली आहे. 

दीपशिखाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की "दादा, वहिनी...आपण राजा शिवाजी हा चित्रपट निर्माण करून आजच्या व पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट उभा करण्यामागे आपण घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहेत. प्रत्येक परिवाराने आपल्या मुलांसह पाहावा असा हा उत्कृष्ट चित्रपट आहे. या सुंदर कलाकृतीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार". 

दीपशिखाने जिनिलीयाचंही कौतुक केलं आहे. "जिनिलीया वहिनी सिनेमाच्या मध्यांतरानंतर महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सीन पाहून माझ्या अंगावर शहारे आले. तो सीन खूप भावनिक होता. तो सीन पाहिल्यांनतर मला अश्रू अनावर झाले. प्रत्येक पत्नीला त्या त्यागामागचं दु:ख समजू शकेल. महाराणी सईबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद", असं दीपशिखाने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

 रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन संभाजीराजे भोसले, विद्या बालन बडी बेगम, संजय दत्त अफजलखान, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, जिनिलीया राणी सईबाई यांच्या भूमिकेत आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल झाले आहेत. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. 'राजा शिवाजी' सिनेमाचं बजेट १०० कोटी असून हा सिनेमा मराठीत इतिहास घडवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title : रानी सईबाई का सीन देखकर रो पड़ीं रितेश देशमुख की भाभी, 'राजा शिवाजी' की समीक्षा।

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' ने किया प्रभावित। उनकी भाभी, दीपशिखा ने फिल्म की सराहना की, खासकर रानी सईबाई के रूप में जेनेलिया का एक दृश्य देखकर वह रो पड़ीं। उन्होंने फिल्म को प्रेरणादायक और परिवारों के लिए अवश्य देखने योग्य बताया।

Web Title : Riteish Deshmukh's sister-in-law cried watching Rani Saibai scene in Raja Shivaji.

Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' impresses. His sister-in-law, Deepshikha, praised the movie, especially a scene featuring Genelia as Rani Saibai, which moved her to tears. She lauded the film as inspirational and a must-watch for families.