बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:21 IST2026-05-01T15:20:43+5:302026-05-01T15:21:00+5:30

Sourav Ganguly on West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालचे नेमके चित्र काय असेल, हे ४ मे रोजीच स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला प्रश्न केला असता, तो अत्यंत संतुलित उत्तर देताना दिसून आला. त्याच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले...

What will be the result of Bengal sourav ganguly googly on the exit poll He said with a smile | बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 

बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 

Sourav Ganguly on Exit Poll : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण अद्यापही शांत झालेले नाही. तेथे अजूनही तणावाचे वातावरण आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. मुख्य लढत सत्ताधारी तृणमूल आणि भाजपमध्ये आहे. आतापर्यंतच्या बहुतांश एक्झि टपोलने भाजप सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, अटीतटीच्या या लढतीत नेमके कोण बाजी मारणार, या संदर्भात सर्वसामान्यांमध्येही जोरदार चर्चा सुरू आहे. थोडक्याते नेमके चित्र काय असेल, हे ४ मे रोजीच स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला प्रश्न केला असता, तो अत्यंत संतुलित उत्तर देताना दिसून आला. त्याच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

"मां दुर्गाही भविष्यवाणी करू शकणार नाही!" -
गांगुली म्हणाला, या निवडणुकीचा अंजात बांधणे एढे सोपे नाही. आता कुणीही काहीही निश्चितपणे सांगू शकेल अशी परिस्थिती नाही. तो पुढे हसत-हसत म्हणाला, "संभाव्य निकालांचा अंदाज तर 'मां दुर्गा' देखील लावू शकणार नाही. सोमवारी मतपेट्या उघडतील आणि मतमोजणीसोबतच, बंगालच्या जनतेने कुणाची निवड केली, हे स्पष्ट होईल. आताच यावर काही बोलणे घाईचे ठरेल." 

दादाचं सावध पवित्र्यात संतुलित उत्तर
खरेतर, भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार दादा (सौरव गांगुली) नेहमीच आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र जेव्हा राजकारणाशी संबंधित प्रश्न येतात, तेव्हा तो अत्यंत सावध पवित्र्यात संतुलित उत्तर देताना दिसतो. याही वेळी त्याने संतुलीतच उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे, अनेक वेळा त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चाही होत असतात.

 

Web Title : बंगाल चुनाव परिणाम भविष्यवाणी? गांगुली का एग्जिट पोल पर गुगली!

Web Summary : सौरव गांगुली ने पश्चिम बंगाल चुनाव परिणामों की भविष्यवाणी करने से परहेज किया। उन्होंने मजाकिया अंदाज में कहा कि 'मां दुर्गा' भी परिणाम की भविष्यवाणी नहीं कर सकतीं। परिणाम 4 मई को स्पष्ट होंगे। गांगुली राजनीतिक अटकलों से बचते हुए सतर्क रहे।

Web Title : Bengal Election Result Prediction? Ganguly's Googly on Exit Polls!

Web Summary : Sourav Ganguly avoids predicting West Bengal election results. He humorously stated even 'Maa Durga' couldn't predict the outcome. Results will be clear on May 4th. Ganguly remained cautious, dodging political speculation.