टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:57 IST2026-05-01T16:41:19+5:302026-05-01T16:57:21+5:30

जेपी मॉर्गनमध्ये महिला बॉसने भारतीय वंशाच्या बँकरवर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Lawsuit Filed Against JP Morgan Executive for Sexual Harassment and Racial Abuse of Junior Staff | टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?

टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?

Chirayu Rana JP Morgan Scandal: जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूक बँक जेपी मॉर्गन चेस सध्या एका अत्यंत गंभीर प्रकरणामुळे वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. कंपनीतील एका उच्चपदस्थ महिला एक्झिक्यूटिव्हने भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला चक्क सेक्स स्लेव्ह बनवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यूयॉर्कच्या न्यायालयात धाव घेण्यात आली असून, पीडित कर्मचाऱ्याने कोर्टात आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला आहे.

जेपी मॉर्गनच्या लिव्हरेज्ड फायनान्स डिव्हिजनमध्ये एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर असलेल्या ३७ वर्षीय लोर्ना हजदिनी यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला आहे. भारतीय वंशाचा ३५ वर्षीय बँकर चिरायु राणा याने लोर्ना यांच्यावर लैंगिक छळ, वर्णद्वेषी टिप्पणी आणि पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप लावले आहेत. चिरायु सध्या दुसऱ्या एका नामांकित फर्ममध्ये महत्त्वाच्या पदावर आहे, पण जेपी मॉर्गनमध्ये असताना आपल्यासोबत छळ झाल्याचे त्याने म्हटले आहे.

प्रमोशनसाठी 'खुश' करण्याची अट

लोर्ना हजदिनी यांनी चिरायुला वारंवार सांगितले होती की, जर त्याला एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पदावर प्रमोशन हवे असेल, तर तिला खुश करावे लागेल. तिने करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन मला शरीरसंबंधांसाठी भाग पाडले, असं राणाने सांगितले. लोर्ना यांनी चिरायुला जबरदस्तीने वायग्रा गोळ्या खाऊ घातल्या आणि त्याचा लैंगिक छळ केला. या छळामुळे चिरायु इतका हतबल झाला होता की, तो अक्षरशः रडू लागला, असा उल्लेख तक्रारीत आहे. लोर्नाने चिरायुला वारंवार ब्राऊन बॉय असं म्हटलं. तसेच तिने ऑफिसमध्येही त्याच्याशी अश्लील भाषेत बोलून त्याला अपमान केल्याचा आरोप आहे. एका वर्क इव्हेंट दरम्यान खासगी क्लबमध्ये लोर्ना यांनी टेबलच्या खालून चिरायुच्या खासगी भागांना स्पर्श करत होती असेही तक्रारीत म्हटले आहे.

बँकेची भूमिका आणि चौकशी सुरु

या प्रकरणावर जेपी मॉर्गनच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, एचआर विभाग आणि वकिलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. "आम्ही फोन रेकॉर्ड्स आणि ईमेल्स तपासले, पण या आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा सापडलेला नाही. तक्रारदाराने स्वतः अंतर्गत चौकशीत सहकार्य करण्यास नकार दिला होता," असे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बँकेने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कोण आहे चिरायु राणा?

चिरायु राणा हा एक अत्यंत हुशार बँकर मानला जातो. जेपी मॉर्गनमध्ये व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून काम केल्यानंतर, तो सध्या ब्रेगल सेजमाउंट या फर्ममध्ये महत्त्वाच्या पदावर आहे. त्याने सॉफ्टवेअर, हेल्थकेयर आणि फायनान्शिअल टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम केले आहे. आपल्या करिअरच्या ऐन उमेदीत एका महिला बॉसकडून झालेल्या या वागणुकीमुळे त्याने आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर जागतिक बँकिंग क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title : जेपी मॉर्गन की महिला अधिकारी पर यौन शोषण का आरोप; मुकदमा दायर।

Web Summary : भारतीय मूल के बैंकर चिरायु राणा ने जेपी मॉर्गन की अधिकारी लोर्ना हज्दिनी पर यौन उत्पीड़न और जबरदस्ती का आरोप लगाया, जिसमें पदोन्नति के लिए यौन संबंध बनाने का आरोप शामिल है। हज्दिनी ने आरोपों से इनकार किया, और जेपी मॉर्गन को राणा के दावों का समर्थन करने के लिए कोई सबूत नहीं मिला।

Web Title : JP Morgan exec accused of sexual coercion; Chirayu Rana sues.

Web Summary : Chirayu Rana, an Indian-origin banker, sues JP Morgan executive Lorna Hadjini for sexual harassment and coercion, alleging forced sexual relations for promotion. Hadjini denies the allegations, and JP Morgan found no evidence to support Rana's claims.