Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 09:26 IST2026-05-01T09:18:09+5:302026-05-01T09:26:26+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 1 May 2026: Maharashta Din, Mumbai Pune Missing Link, US Iran talks, Crude Oil Prices, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, West Bengal Election, Vidhan Parishad, Raj Thackeray | Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात

Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

01 May, 26 : 10:59 AM

एनसीबीने मुंबईत पकडलं १७४५ कोटी रुपयांचं ३४९ किलो कोकेन, मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

एनसीबीने मुंबईत पकडलं ३४९ किलो कोकेन, मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश,  आंततराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १७४५ कोटी रुपये असल्याची माहिती

01 May, 26 : 10:00 AM

भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या वाहनाला अपघात, ड्रायव्हरला किरकोळ दुखापत

भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारला शुक्रवारी सकाळी ठाणे जिल्ह्यात अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गुजरातच्या दिशेने जात असताना घोडबंदर रोडवर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. खासदार हेमंत सावरा सुखरूप आहेत, परंतु चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

01 May, 26 : 09:47 AM

मुंबई-पुणे मिसिंग लिंक: सह्याद्रीच्या कुशीतील अद्भुत प्रकल्पाची खास सफर

मुंबई-पुणे मिसिंग लिंक म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीतील अद्भुत प्रकल्प. या प्रकल्पाची खास सफर करूया व्हिडीओच्या माध्यमातून...

01 May, 26 : 09:45 AM

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावर आज मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, पण भाषेच्या नावावर केली जाणारी हिंसा आम्हाला मान्य नाही," असे देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले. वाचा सविस्तर बातमी

01 May, 26 : 09:41 AM

मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकात नोंद; आज लोकार्पण, प्रवास आणखी वेगात

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बोगद्याला जगातील सर्वांत रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. हा बोगदा तब्बल २३.५ मीटर रुंदीचा आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वाचा सविस्तर बातमी

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 1 May 2026: Maharashta Din, Mumbai Pune Missing Link, US Iran talks, Crude Oil Prices, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, West Bengal Election, Vidhan Parishad, Raj Thackeray