मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:14 IST2026-05-01T08:11:12+5:302026-05-01T08:14:46+5:30

मिसिंग लिंक प्रकल्पात २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

Mumbai-Pune Missing Link recorded in Guinness Book; will be inaugurated today on Maharashtra Day, travel will be faster | मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात

मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात

अमर शैला

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे यांच्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बोगद्याला जगातील सर्वांत रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारणी केलेला हा बोगदा तब्बल २३.५ मीटर रुंदीचा आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  होत असून, याच कार्यक्रमात गिनीज समितीकडून हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

प्रवास आणखी वेगात...
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या खंडाळा घाटात अनेकदा वाहतूककोंडी होते. त्यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत (सिंहगड कॉलेज) १३.३ किमी लांबीचा मार्ग उभारला असून, त्यात दोन बोगदे आहेत. त्यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी ८.८७ किलोमीटर असून, दुसरा बोगदा १.६८ किमी लांबीचा आहे. या प्रत्येक दिशेच्या बोगद्यात वाहतुकीसाठी चार मार्गिका, तसेच एक सर्व्हिस लेन अशा पाच मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. 

महाकाय बोगदा...
एवढ्या रुंदीचा बोगदा तयार करताना माती ढासळण्याची भीती असते. त्यामुळे सहसा १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणले जात नाहीत. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पाहता २३.५ मीटर  रुंदीचा बोगदा तयार केला आहे तसेच बोगद्यातील अंतर्गत सुरक्षेची कामे केल्यानंतर त्याची रुंदी साधारणपणे २२.३३ मीटर एवढी आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पात २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. जगातील हा सर्वाधिक रुंदीचा बोगदा ठरला असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. - राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Web Title : मुंबई-पुणे मिसिंग लिंक गिनीज में, यात्रा समय में भारी कटौती

Web Summary : मुंबई-पुणे मिसिंग लिंक सुरंग, अब गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में दर्ज, महाराष्ट्र दिवस पर खुली। 23.5 मीटर चौड़ी सुरंग एक्सप्रेसवे से यात्रा के समय को कम करती है, खोपोली यातायात को बाईपास करती है। इस 13.3 किमी मार्ग में दो सुरंगें शामिल हैं, जो कनेक्टिविटी में काफी सुधार करती हैं।

Web Title : Mumbai-Pune Missing Link Enters Guinness, Cuts Travel Time Significantly

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link tunnel, now in Guinness World Records for width, opens Maharashtra Day. The 23.5-meter wide tunnel shortens travel time via the expressway, bypassing Khopoli traffic. This 13.3 km route includes two tunnels, significantly improving connectivity.