Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 09:13 IST2026-05-01T09:10:18+5:302026-05-01T09:13:48+5:30

Madhya Pradesh Jabalpur Cruise Boat Capsized: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली, यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जणांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Madhya Pradesh Jabalpur Horrific Accident, Cruise Boat Capsized in Bargi Dam,  9 Bodies Recovered | Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू

Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात एक मोठी दुर्घटना घडली. सोसाट्याचा वारा आणि उसळणाऱ्या लाटांमुळे पर्यटकांनी खचाखच भरलेली एक क्रूझ बोट अचानक पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.  बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून १५ पर्यटकांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही लोक अद्याप बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे शोध आणि बचाव मोहीम अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझ बोट पर्यटकांना घेऊन धरणाच्या जलाशयातून जात असताना संतुलन बिघडल्याने उलटली. आज सकाळपासूनच घटनास्थळावर मदत आणि बचावकार्याची दृश्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काही लोक अद्यापही बेपत्ता असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Web Title : जबलपुर क्रूज पलटी: बरगी बांध त्रासदी में नौ की मौत

Web Summary : मध्य प्रदेश के बरगी बांध में तेज हवाओं के कारण एक क्रूज नाव पलटने से नौ लोगों की मौत हो गई। बचाव दल ने पंद्रह लोगों को बचाया, लापता लोगों की तलाश जारी है।

Web Title : Jabalpur Cruise Capsizes: Nine Dead in Bargi Dam Tragedy

Web Summary : A cruise boat capsized in Madhya Pradesh's Bargi Dam due to strong winds, killing nine. Rescue teams saved fifteen, and a search continues for the missing.