परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:45 IST2026-05-01T16:44:46+5:302026-05-01T16:45:55+5:30

परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांचे आज दिनांक एक मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले.

Partur's 'development man' lost! Former MLA Suresh Kumar Jaithalia passes away due to heart attack | परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

जालना : परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांचे आज दिनांक एक मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. माजी आमदार सुरेश कुमार यांनी विधान परिषदेचे सहा वर्षे तर विधानसभेची पाच वर्षे या मतदारसंघातून नेतृत्व केले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी विधानसभेचे काँग्रेसने तिकीट नाकारल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केला. 

माजी आमदार सुरेश कुमार घेतल्या यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात परतुर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे केली याबरोबरच परतूर नगरपालिकेवर जवळपास 35 वर्षे त्यांची निर्विवाद सत्ता राहिली या माध्यमातून त्यांनी शहरात रस्ते शुद्ध पाणीपुरवठा योजना घनकचरा प्रकल्प सह विविध विकासकामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले होते. 

भाजप नेते आमदार बबनराव लोणीकर यांना तुल्यबळ लढत देणारे नेते म्हणूनही माजी आमदार जेथलिया यांच्याकडे पाहिले जात होते. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करून मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती यांचा मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी परिस्थिती होती. एकूणच त्यांच्या अकाली निधनाने मतदारसंघातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगराध्यक्ष विमलताई जेथलिया, मुले युवा नेते नितीन, जेथलिया प्रवीण जेथलिया सह भाऊ बहिणी सुना, नातवंडे  असा मोठा परिवार आहे.

Web Title : परतूर के 'विकास पुरुष' सुरेश कुमार जेठलिया का निधन

Web Summary : परतूर के पूर्व विधायक सुरेश कुमार जेठलिया का हृदय गति रुकने से निधन हो गया। उन्होंने विधान परिषद सदस्य और विधायक के रूप में कार्य किया, निर्वाचन क्षेत्र और नगरपालिका में महत्वपूर्ण विकास कार्य किए। उनके नेतृत्व और सामाजिक योगदान को याद किया जाएगा।

Web Title : Paratpur's 'Development Man' Suresh Kumar Jethalia Passes Away

Web Summary : Former MLA Suresh Kumar Jethalia of Partur passed away due to a heart attack. He served as an MLC and MLA, undertaking significant development work in the constituency and municipality. His leadership and social contributions will be missed.