कलांजली पैठणीचे ट्रेंडींग कलेक्शन; १२ सुंदर रंगात, हॅण्डवर्क केलेलं ब्लाऊज मिळेल-रॉयल दिसाल
Updated:May 1, 2026 13:11 IST2026-05-01T12:49:43+5:302026-05-01T13:11:32+5:30
Latest Collection Of Kalanjali Paithani (Kalanjali Paithani With Hand Work Blouse) : या साडीला पारंपारीक पद्धतीची रुंद आणि नाजूक विणकाम केलेली काठ असते जी साडीच्या सौंदर्यात भर घालते.

सध्या पैठणीमध्ये कलांजली पैठणी ही खूपच ट्रेंडीग आहे. लग्नसराईत आणि सणासुदीच्या काळात कलांजली पैठणीला प्रचंड मागणी आहे. (Latest Collection Of Kalanjali Paithani)
ही साडी अत्यंत मऊ आणि उच्च दर्जाच्या प्रिमियम कापडापासून तयार केली जाते. ज्यामुळे नेसल्यानंतर फुगत नाही. अंगाला चापून चोपून बसते. (Kalanjali Paithani in 12 Colors)
या साडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे हॅण्डवर्क केलेले आरी वर्कचे ब्लाऊज पीस. हे ब्लाऊज या साडीला अधिकच आकर्षक बनवते. (Kalanjali Paithani With Hand Work Blouse)
ब्लाऊजवर अतिशय सुबक आणि हातानं केलेले कलाकुसरीचे काम पाहायला मिळते. पूर्ण साडीवर सुंदर आणि लहान आकाराच्या नाजूक बुट्ट्यांचे डिझाईन्स असते.
ही साडी साधारण १० ते १२ वेगवेगळ्या गडद आणि पेस्टल रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. सॉफ्ट क्लालिटीमुळे ही साडी नेसायला अत्यंत हलकी आणि दिवसभर सांभाळायला सोपी असते.
पैठणीची पारंपारीक लूक आणि मॉडर्न आरी वर्क यामुळे ही साडी एक वेगळाच रूबाब देते. साडीचा पदर भरगच्च विणकाम असलेला आणि रिच लूक देणारा असतो.
लग्नकार्य, डोहाळे जेवण किंवा मोठ्या पूजा अर्चांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. यात तुम्हाला आरामदायी वाटण्यासोबतच एक अतिशय स्टायलिश आणि रॉयल लूक मिळतो.
या साडीला पारंपारीक पद्धतीची रुंद आणि नाजूक विणकाम केलेली काठ असते जी साडीच्या सौंदर्यात भर घालते.
आरी वर्कचे ब्लाऊज कस्टमाईज करून शिवल्यावर साडीला एक डिझाननर टच मिळतो जो सर्वसाधारण पैठणीपेक्षा वेगळा ठरतो.
प्रिमियम क्वालिटी असूनही ही साडी सर्व सामान्यांच्या बेजटमध्ये आणि व्हॅल्यू फॉर मनी मानली जाते.
नातेवाईकांना गिफ्ट म्हणऊन देण्यासाठी तसंच लग्नकार्यात नेसण्याठी उत्तम पर्याय आहे.
या साडीत तुम्हाला 12 सुंदर रंग उपलब्ध होतील आणि किंमत 2000 ते 3000 या रेंजमध्ये आहे. (Image Credit - Vardaan Paithani, Instagram)