तिशी ओलांडलेल्या गिरिजाला मिळेल का प्रेम? 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

By कोमल खांबे | Updated: May 1, 2026 11:46 IST2026-05-01T11:45:43+5:302026-05-01T11:46:06+5:30

क्या बात! 'सुख म्हणजे नक्की...' फेम गिरिजा प्रभूची हिंदी मालिकेत वर्णी, दिसणार मुख्य भूमिकेत, प्रोमो समोर

sukh mhanje nakki kay asat fame actress girija prabhu hindi serial entry | तिशी ओलांडलेल्या गिरिजाला मिळेल का प्रेम? 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

तिशी ओलांडलेल्या गिरिजाला मिळेल का प्रेम? 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेत गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली. मालिकेतील गौरी आणि जयदीपची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पहिल्याच मालिकेने गिरिजाला प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत गिरिजा दिसली होती. आता हिंदी टेलिव्हिजन विश्वात गिरिजा दमदार पदार्पण करत आहे. 'तीस के पार जब मिला प्यार' या मालिकेतून गिरिजा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'तीस के पार जब मिला प्यार' या हिंदी मालिकेत गिरिजाची वर्णी लागली असून या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गिरिजाच्या या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये गिरिजा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी दिसत आहे. घरातील जबाबदाऱ्या आणि आर्थिक भार पेलणारी अशा मुलीची भूमिका गिरिजा साकारत आहे. वयाची तिशी पार केलेली आणि लग्न न झालेली ही मुलगी प्रेमाच्या शोधात आहे, असं प्रोमोमध्ये दिसतं. पण, ३२व्या वर्षी तिला प्रेम मिळेल का? तिचा जोडीदार आयुष्यात एन्ट्री घेईल का? या प्रश्नांची उत्तरं मालिका पाहूनच मिळतील. 


गिरिजा प्रभूसोबत 'तीस के पार जब मिला प्यार' मालिकेत अभिनेता पुलकित जैन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ही मालिका चाहत्यांना दंगल टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. मराठीचा छोटा पडदा गाजवल्यानंतर आता गिरिजा हिंदी टेलिव्हिजन विश्वात एन्ट्री घेत असल्याने चाहतेही खूश आहेत. तिला हिंदी मालिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. गिरिजाच्या या नव्या मालिकेच्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. 

Web Title : गिरिजा की नई हिंदी श्रृंखला: क्या अभिनेत्री को प्यार मिलेगा?

Web Summary : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' से मशहूर गिरिजा प्रभु ने 'तीस के पार जब मिला प्यार' के साथ हिंदी टीवी में शुरुआत की। वह एक मध्यमवर्गीय परिवार में 30 से अधिक उम्र की महिला की भूमिका निभा रही हैं, जो प्यार की तलाश में है। यह धारावाहिक दंगल टीवी पर प्रसारित किया जाएगा।

Web Title : Girishja's new Hindi series: Will the actress find love?

Web Summary : Girija Prabhu, famed for 'Sukh Mhanje Nakki Kay Asta,' debuts in Hindi TV with 'Tees Ke Paar Jab Mila Pyaar.' She plays a woman over 30 seeking love in a middle-class family. The series will be aired on Dangal TV.