मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:29 IST2026-05-01T12:29:10+5:302026-05-01T12:29:41+5:30
Crime News:

मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने मुंबईमध्ये धडाकेबाज कारावी करत सुमारे ३४९ किलो वजनाचे हायग्रेड कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या कोकेनची किंमत तब्बल १७४५ कोटी रुपये एवढी आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
या संदर्भात माहिती देताना केलेल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी लिहिले की, अंमली पदार्थांची तस्करी करणारी साखळी मोडून काढण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने नुकताच मुंबईमध्ये एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या कारवाईत तब्बल १७४५ कोटी रुपये किंमत असलेलं ३४९ किलो हाय ग्रेड कोकेन जप्त करण्यात आलं आहे. अंमली पदार्थांच्या एका छोट्या साठ्याचा शोध घेताना त्यावरून तस्करीच्या एका मोठ्या जाळ्याला उद्ध्वस्त करण्याच्या बॉटम टू टॉप कारवाईचं हे एक उदाहरण आहे. या यशस्वी कारवाईसाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मी अभिनंदन करतो, अशा शब्दात अमित शाह यांनी या कारवाईचं कौतुक केलं आहे.
We are resolved to ruthlessly crush the narcotics cartel.
— Amit Shah (@AmitShah) May 1, 2026
The @narcoticsbureau has cracked down on a major international narcotics ring seizing 349 kgs of High-Grade cocaine worth Rs.1745 crore in Mumbai. This is a trailblazing example of bottom to top approach where the agency…