Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?

LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?

LPG Price Hike: मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे १००० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:49 IST2026-05-01T11:46:40+5:302026-05-01T11:49:54+5:30

LPG Price Hike: मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे १००० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली.

LPG Price Hike Commercial cylinder prices increased by up to Rs 1500 this year Why did LPG rates increase check new rates mumbai to delhi | LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?

LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?

LPG Price Hike: मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत सुमारे १००० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली. एलपीजीच्या दरात इतकी मोठी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत याचे नवीन दर ३,०७१.५० रुपयांवर पोहोचलेत. मात्र, सर्वात मोठा दिलासा म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दर यावर्षी जवळजवळ दुप्पट

जानेवारीपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. यावर्षी आतापर्यंत कमर्शियल सिलिंडरचे दर सुमारे १५०० रुपयांनी वाढलेत. जानेवारीत १११ रुपये, फेब्रुवारीत ४९ रुपये आणि मार्चमध्ये एकूण १४४ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १ एप्रिल रोजी सुमारे २०० रुपयांची वाढ करण्यात आली आणि आता मे महिन्यात ९९३ रुपयांची मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. इंडियन ऑईलच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत १ डिसेंबर २०२५ रोजी कमर्शियल सिलिंडरची किंमत केवळ १,५८०.५० रुपये होती.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा

प्रमुख शहरांमधील नवीन दर (१९ किलो एलपीजी)

नवीन दरांनंतर प्रमुख शहरांतील कमर्शियल सिलिंडरच्या किमती खालीलप्रमाणे आहेत 

  • दिल्ली: ३,०७१.५० रुपये
  • मुंबई: ३,०२४ रुपये
  • कोलकाता: ३,२०२ रुपये
  • चेन्नई: ३,२३७ रुपये
  • बंगळुरू: ३,१५२ रुपये
  • अहमदाबाद: ३,०९१ रुपये
  • पुणे: ३,०८४ रुपये

घरगुती सिलिंडरचे दर यावर्षी केवळ ६० रुपयांनी वाढले

घरगुती सिलिंडरबद्दल बोलायचं झालं तर सामान्य कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी ही आहे की, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज १ मे रोजी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुमारे ३३ कोटी ग्राहक अजूनही गेल्या महिन्यातील जुन्या दरांवरच घरगुती सिलेंडर घेऊ शकतील. यामुळे आंतरराष्ट्रीय किमतींमधील चढ-उताराचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर होणार नाही. या वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत घरगुती सिलेंडरच्या किमती केवळ ६० रुपयांनी वाढल्या आहेत.

कमर्शियल एलपीजीच्या किमती का वाढल्या?

कमर्शियल एलपीजीच्या किमतीतील ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या अनिश्चिततेचा परिणाम आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियात सुरू झालेला तणाव आता आठव्या आठवड्यात पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे होर्मुझमधून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झालाय. हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, येथील कोणत्याही अडथळ्याचा थेट परिणाम जगभरातील तेल आणि वायूच्या किमतींवर होतो.

Web Title : कमर्शियल एलपीजी की कीमतों में उछाल: इस साल ₹1500 की वृद्धि, कारण सामने।

Web Summary : कमर्शियल एलपीजी सिलेंडर की कीमतों में भारी वृद्धि हुई है, इस साल ₹1500 की बढ़ोतरी हुई है। यह उछाल अंतरराष्ट्रीय बाजार की अस्थिरता और तेल आपूर्ति में व्यवधान के कारण है। घरेलू सिलेंडर की कीमतें अपेक्षाकृत स्थिर हैं, इस वर्ष केवल ₹60 की वृद्धि हुई है।

Web Title : Commercial LPG prices surge: ₹1500 hike this year, reasons revealed.

Web Summary : Commercial LPG cylinder prices have risen sharply, increasing by ₹1500 this year. The surge is attributed to international market volatility and tensions disrupting oil supplies. Domestic cylinder prices remain relatively stable, with only a ₹60 increase this year.