धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक

Sri Lanka Cricket Crime News: हॉटेलच्या बाथरूममध्ये घडला विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:12 IST2026-05-01T11:06:33+5:302026-05-01T11:12:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
shocking two cricketers arrested for secretly filming women bathing in bathrooms | धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक

धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक

Sri Lanka Cricket Crime News: श्रीलंकन ​​क्रिकेटमधून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. कोलंबोमधील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या श्रीलंकन ​​अंडर-१९ संघातील दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलांचे गुपचूप चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या कृत्याचा संपूर्ण संघ आणि बोर्डाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

बाथरूममध्ये मोबाईल फोनने अश्लील व्हिडिओंचे शूटिंग

ही घटना कोलंबोच्या नाराहेनपिटा परिसरात घडली. हॉटेलमध्ये थांबलेल्या काही महिलांनी तक्रार केली की, त्या अंघोळ करत असताना कोणीतरी मोबाईल फोनने त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी तपास केला असता, या दोन तरुण क्रिकेटपटूंवर संशय आला. तपासात त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ सापडले. या मुलांनी हे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले होते का, याचा तपास नाराहेनपिटा पोलीस आता करत आहे.

५ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका, प्रकरणाचा तपास अजूनही सुरू

दोन तरुणांना अटक केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची ५ लाख श्रीलंकन ​​रुपयांच्या जामिनावर सुटका केली असली तरी, त्यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. त्यांना २५ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागेल. त्यांनी असे आणखी किती गैरप्रकार केले आहेत हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फोन जप्त केले आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डात गोंधळ

सहसा बोर्ड अशा कृत्यांवर तात्काळ कारवाई करते, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या फारच अस्वस्थतेत आणि आर्थिक संकटात आहे. गेल्या दोन दिवसांत, बोर्डाने माजी अधिकाऱ्यांना हटवून नवीन समिती स्थापन केली आहे. या गोंधळामुळे या खेळाडूंवर अद्याप अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की त्यांची कारकीर्द आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

Web Title : हैरान करने वाला! बाथरूम में महिलाओं का वीडियो बनाने पर क्रिकेट खिलाड़ी गिरफ्तार

Web Summary : कोलंबो में दो श्रीलंकाई अंडर-19 क्रिकेटरों को होटल के बाथरूम में महिलाओं का गुप्त रूप से वीडियो बनाने के आरोप में गिरफ्तार किया गया। वे जमानत पर बाहर हैं। घटना के बाद श्रीलंका क्रिकेट बोर्ड में उथल-पुथल मची है और खिलाड़ियों पर प्रतिबंध लग सकता है।

Web Title : Shocking! Cricketers Arrested for Filming Women in Bathroom: Report

Web Summary : Two Sri Lankan Under-19 cricketers were arrested in Colombo for secretly filming women in a hotel bathroom. They are out on bail. The Sri Lanka Cricket board is in turmoil following the incident and may ban the players for their actions.