बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:37 IST2026-05-01T12:27:15+5:302026-05-01T12:37:29+5:30
Pulsar NS400Z Launched: दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने आपल्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या बजाज पल्सर NS400Z च्या किमतीत मोठी कपात करून ग्राहकांना सुखद धक्का दिला.

किंमत आणि मोठी बचत: नव्या बजाज पल्सर NS400Z ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत १,८०,०९२ रुपये इतकी करण्यात आली आहे. कमी झालेली एक्स-शोरूम किंमत, विमा आणि नोंदणी शुल्क यांमुळे ग्राहकांची एकूण २४,५०० रुपयांची मोठी बचत होणार आहे.

इंजिनमध्ये धोरणात्मक बदल: या बाइकचे इंजिन पूर्वीच्या ३७३.२ सीसीवरून ३४९ सीसी करण्यात आले आहे. या बदलामुळे ही मोटरसायकल १८% जीएसटी (GST) कक्षेत आल्याने ती ग्राहकांसाठी अधिक परवडणारी झाली आहे.

दमदार परफॉर्मन्स कायम: इंजिनची क्षमता कमी केली असली तरी कामगिरीत तडजोड केलेली नाही. हे लिक्विड-कूल्ड इंजिन अजूनही ४०.६ पीएस (PS) पॉवर जनरेट करते, ज्यामुळे बाइकचा 'हाय-परफॉर्मन्स' दर्जा कायम आहे.

आधुनिक फीचर्सची मेजवानी: स्वस्त होऊनही बाइकमध्ये ४ राईड मोड्स, क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल-चॅनेल एबीएस आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे प्रगत फीचर्स कायम ठेवण्यात आले आहेत.

रायडर्ससाठी सुवर्णसंधी: ट्रायम्फ आणि केटीएमच्या धर्तीवर बजाजने घेतलेल्या या निर्णयामुळे, प्रीमियम स्पोर्ट्स बाइक आता सामान्य रायडर्सच्या बजेटमध्ये आली असून ती बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करेल.

















