Raja Shivaji X Review: अंगावर शहारे अन् मराठीतला ब्लॉकबस्टर! 'राजा शिवाजी' सिनेमा कसा आहे?

By कोमल खांबे | Updated: May 1, 2026 12:37 IST2026-05-01T12:37:23+5:302026-05-01T12:37:39+5:30

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे महाराष्ट्र दिनादिवशी आज सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी X वर ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Raja Shivaji X Review ritesh deshmukh gives powerpack performance fans reacted after watching movie | Raja Shivaji X Review: अंगावर शहारे अन् मराठीतला ब्लॉकबस्टर! 'राजा शिवाजी' सिनेमा कसा आहे?

Raja Shivaji X Review: अंगावर शहारे अन् मराठीतला ब्लॉकबस्टर! 'राजा शिवाजी' सिनेमा कसा आहे?

Raja Shivaji : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे महाराष्ट्र दिनादिवशी आज सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून या सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. शिवरायांवर मराठीत पहिल्यांदाच इतका भव्य ऐतिहासिक सिनेमा बनवण्यात आला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी X वर ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

तरण आदर्श यांनी रितेशच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला पॉवर पॅक म्हटलं आहे. "भारताचे महान पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण केलेला दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी साकारलेला हा भव्य सिनेमा एक मैलाचा दगड ठरणार आहे", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तरण आदर्श यांनी 'राजा शिवाजी' सिनेमाला ५ पैकी साडेचार स्टार्स दिले आहेत. 

एका X अकाऊंटवरुन 'राजा शिवाजी' सिनेमाचा रिव्ह्यू करण्यात आला आहे. रितेश देशमुख सिनेमाचं मुख्य आकर्षण असल्याचं म्हटलं गेलं आहे. मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारचे युद्धाचे सीन्स दाखवण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. 

"मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा. रितेश देशमुखने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला आणि पराक्रमी स्वभावाला प्रभावीपणे साकारले आहे", असं एका रिव्ह्यूमध्ये म्हटलं गेलं आहे. 

रितेशने अशक्य ते शक्य करून दाखवलंय. फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक दिग्दर्शक म्हणून त्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना हा सिनेमा समर्पित केला आहे. हा सिनेमा म्हणजे फक्त बायोपिक नव्हे तर हा ऐतिहासिक कथाकथनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जो प्रखर भावना आणि भव्यतेचा अप्रतिम समतोल साधतो.

दरम्यान, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन संभाजीराजे भोसले, विद्या बालन बडी बेगम, संजय दत्त अफजलखान, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, जिनिलीया राणी सईबाई यांच्या भूमिकेत आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल झाले आहेत. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. 'राजा शिवाजी' सिनेमाचं बजेट १०० कोटी असून हा सिनेमा मराठीत इतिहास घडवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title : राजा शिवाजी: ब्लॉकबस्टर मराठी फिल्म ने मचाई धूम! ऐतिहासिक फिल्म अवश्य देखें।

Web Summary : रितेश देशमुख द्वारा निर्देशित 'राजा शिवाजी' एक सिनेमाई मील का पत्थर है। समीक्षकों ने छत्रपति शिवाजी महाराज के शक्तिशाली चित्रण की सराहना की है, जिसमें संजय दत्त और अभिषेक बच्चन सहित कलाकारों का शानदार प्रदर्शन है। फिल्म को सकारात्मक समीक्षा और हाउसफुल शो मिल रहे हैं।

Web Title : Raja Shivaji: Blockbuster Marathi film electrifies! A must-watch historical epic.

Web Summary : Riteish Deshmukh's directorial debut, 'Raja Shivaji,' is a cinematic milestone. Critics laud the film's powerful portrayal of Chhatrapati Shivaji Maharaj, with stellar performances from the cast, including Sanjay Dutt and Abhishek Bachchan. The film has been receiving positive reviews and houseful shows.