भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:31 IST2026-05-01T13:30:35+5:302026-05-01T13:31:20+5:30

Hemant Savara Car Accident: ठाणे-घोडबंदर रोडवर हा अपघात झाल्याची माहिती

Hemant Savara Car Accident dumper-rammed-into-bjp-mp-car-airbags-open-saved-life driver injured | भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव

भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव

Hemant Savara Car Accident: महाराष्ट्रातील ठाणे येथे शुक्रवारी पहाटे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारचा अपघात झाला. पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पालघरचे खासदार हेमंत सावरा सुखरूप बचावले असून, वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात घोडबंदर रोडवर झाला. त्यांनी सांगितले की, कार गुजरातच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरला धडकली.

एअरबॅग्जमुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचला...

अधिकाऱ्याने सांगितले की, कारमधील एअरबॅग्ज तात्काळ उघडल्याने प्रवाशांचा जीव वाचला. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत केली. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खासदार सावरा आणि अपघातग्रस्त कार दिसत आहे.

अपघातानंतर सावरा काय म्हणाले?

खासदार हेमंत सावरा यांच्या म्हणण्यानुसार, ते महाराष्ट्र दिनाशी संबंधित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ठाण्याहून पालघरला जात होते. वर्सोवा खाडी पूल (भाईंदर खाडी पूल) ओलांडल्यानंतर लगेचच एका डंपर ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. ते म्हणाले, "डंपर चालकाला आमची गाडी दिसली नाही आणि त्याने आम्हाला धडक दिली." सावरा यांनी पुढे स्पष्ट केले की, गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे त्यांचे वाहन मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर चुकीच्या दिशेने जात होते.

Web Title : भाजपा सांसद हेमंत सावरा की कार ठाणे के पास दुर्घटनाग्रस्त; एयरबैग से बची जान।

Web Summary : भाजपा सांसद हेमंत सावरा की कार ठाणे के पास एक डंपर से टकरा गई। एयरबैग खुलने से सावरा और उनके ड्राइवर की जान बच गई, ड्राइवर को मामूली चोटें आईं। घटना घोडबंदर रोड पर हुई जब कार गुजरात की ओर जा रही थी। सावरा महाराष्ट्र दिवस के एक कार्यक्रम में भाग लेने पालघर जा रहे थे।

Web Title : MP Hemant Savara's car crashes near Thane; airbags save him.

Web Summary : BJP MP Hemant Savara's car collided with a dumper near Thane. Airbags deployed, saving Savara and his driver, who sustained minor injuries. The incident occurred on Ghodbunder Road as the car headed towards Gujarat. Savara was en route to a Maharashtra Day event in Palghar.