"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक

By कोमल खांबे | Updated: May 1, 2026 13:57 IST2026-05-01T13:56:42+5:302026-05-01T13:57:09+5:30

'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. नुकतंच या सिनेमाचा प्रिमियर पार पडला. या प्रिमियरला बिग बॉस मराठीच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. दिपाली सय्यदने 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर व्हिडीओ शेअर केला आहे. 

raja shivaji movie marathi actress deepali sayyed praised ritesh deshmukh after watching hostorical drama | "आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक

"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक

Raja Shivaji : रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा आज १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठीतील शिवरायांवर बनणारा हा पहिलाच भव्य सिनेमा आहे. ज्याचं बजेट १०० कोटी इतकं आहे. 'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. नुकतंच या सिनेमाचा प्रिमियर पार पडला. या प्रिमियरला बिग बॉस मराठीच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. दिपाली सय्यदने 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर व्हिडीओ शेअर केला आहे. 

'राजा शिवाजी' पाहून भारावलेली दिपाली म्हणाली, "तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी कालच राजा शिवाजी सिनेमा पाहिला. मी तुम्हाला सांगू इच्छिते की इतका अप्रतिम सिनेमा बनवला आहे. मी रितेश विलासराव देशमुख म्हणजेच भाऊ यांचं काय कौतुक करू...आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की यांनी काय सिनेमा बनवला असेल, अनेकांनी ट्रोलही केलं होतं. ते बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की खरंच सिनेमात ट्रोल करण्यासारखं काही आहे का? पण जेव्हा मी सिनेमा पाहिला...प्रत्येक भूमिका मग ती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सईबाईंचा असू दे किंवा अफझलखान...प्रत्येकानेच आपले १०० टक्के दिले आहेत. आणि स्वत: रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिमपणे साकारली आहे". 


"महाराजांनी आपल्यासाठी जे केलंय. जेव्हा आपण या महाराष्ट्रात नाक वर करून चालतो, ते फक्त महाराजांमुळेच... अशा महाराजांवर चित्रपट बनवला गेला आहे. आणि चित्रपट बनवणाऱ्याचं काळीजही तसंच लागतं. मला खरंच रितेशजींचं कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी हा चित्रपट त्याच काळजाने बनवला आहे. इतका सुंदर हा सिनेमा आहे की मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाने हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे", असं म्हणत दिपालीने चाहत्यांना 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. 

दरम्यान, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन संभाजीराजे भोसले, विद्या बालन बडी बेगम, संजय दत्त अफजलखान, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, जिनिलीया राणी सईबाई यांच्या भूमिकेत आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल झाले आहेत. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. 'राजा शिवाजी' सिनेमाचं बजेट १०० कोटी असून हा सिनेमा मराठीत इतिहास घडवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title : दीपाली सय्यद ने 'राजा शिवाजी' की प्रशंसा की; रितेश देशमुख की सराहना।

Web Summary : दीपाली सय्यद 'राजा शिवाजी' देखने के बाद बहुत प्रभावित हुईं, रितेश देशमुख के निर्देशन और प्रदर्शन की प्रशंसा की। उन्होंने सभी से सिनेमाघरों में फिल्म देखने का आग्रह किया। फिल्म में अभिषेक बच्चन, विद्या बालन, संजय दत्त और जेनेलिया डिसूजा हैं।

Web Title : Deepali Sayed praises 'Raja Shivaji'; Ritesh Deshmukh lauded.

Web Summary : Deepali Sayed was deeply moved after watching 'Raja Shivaji', praising Ritesh Deshmukh's direction and performance. She urged everyone to watch the movie in theaters. The film features Abhishek Bachchan, Vidya Balan, Sanjay Dutt, and Genelia D'Souza.