मराठमोळी अभिनेत्री गाजवणार दाक्षिणात्य इंडस्ट्री! कमल हसन यांच्या बिग बजेट चित्रपटात झळकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:04 IST2026-05-07T16:42:58+5:302026-05-07T17:04:31+5:30
मराठमोळ्या सौंदर्याचा डंका आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वाजणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री गाजवणार दाक्षिणात्य इंडस्ट्री! कमल हसन यांच्या बिग बजेट चित्रपटात झळकणार!
मराठमोळ्या सौंदर्याचा डंका आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वाजणार आहे. साऊथचा सुपरस्टार शिवकार्तिकेयनच्या आगामी 'सेयोन' (Seyon) या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता होती, आता त्यात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची असून मराठी कुटुंबात जन्माला आली आहे.
तर ती आहे भाग्यश्री बोरसे (Bhagyashri Borse). भाग्यश्रीच्या २६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सेयोन'च्या निर्मात्यांनी तिचा चित्रपटातील फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केले आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भाग्यश्री बोरसे अतिशय साध्या, शांत आणि तितक्याच प्रभावी लूकमध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक मोरपिस असून तिच्या डोळ्यांतील निरागसतेने चाहत्यांना भुरळ घातली.
'सेयोन' हा एक तमिळ ॲक्शन-ड्रामा चित्रपट असून, याचे दिग्दर्शन सिवकुमार मुरुगेशन करत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती दिग्गज अभिनेते कमल हसन यांच्या 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल' (RKFI) या बॅनरखाली केली जात आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन एका माजी सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो नंतर समाजसेवक बनतो. या चित्रपटासाठी शिवकार्तिकेयनला तब्बल ६५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
A birthday to remember and a journey to look forward to!
— Raaj Kamal Films International (@RKFI) May 6, 2026
Wishing #BhagyashriBorse A very Happy Birthday as she joins the #Seyon Family #HappyBirthdayBhagyashri#சேயோன்#OneMoreTime#KamalHaasan#Sivakarthikeyan@ikamalhaasan@Siva_Kartikeyan#Mahendran@Dir_SivakumarM… pic.twitter.com/GvVIxmoZQv
भाग्यश्री बोरसेचा साऊथमध्ये दबदबा
मूळची महाराष्ट्राची असलेल्या भाग्यश्री बोरसेसाठी हा दुसरा तमिळ चित्रपट ठरणार आहे. याआधी ती 'कांथा' या चित्रपटात झळकली होती. भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील 'लेगोज'शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. हिंदीत नशीब आजमावल्यानंतर भाग्यश्री साऊथमध्ये शिफ्ट झाली.