Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:09 IST2026-05-07T16:06:23+5:302026-05-07T16:09:22+5:30

Mumbai Watermelon Death Case Update: मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होऊ शकेल. हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यातून हे स्पष्ट होईल की, या मृत्यूमागे काही विषारी घटक होते की मृत्यू इतर कोणत्याही कारणाने झाला आहे. 

mumbai paydhuni family death mystery no poison found fsl report awaited | Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?

Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?

Mumbai Watermelon Death Case: मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. तपासात पोलिसांना कोणत्याही प्रकारचे विषारी घटक आढळलेले नाहीत. पोलीस आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयाच्या ब्लड रिपोर्टनुसार, चौघांच्या रक्तात कोणतंही 'बॅक्टेरियल इन्फेक्शन' आढळलेलं नाही. 

या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीचा तर्क असा होता की, बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या फूड पॉयझनिंगमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होऊ शकेल. हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यातून हे स्पष्ट होईल की, या मृत्यूमागे काही विषारी घटक होते की मृत्यू इतर कोणत्याही कारणाने झाला आहे. 

तपास वेगाने सुरू

मृतांमध्ये नसरिन डोकाडिया (३५), आयशा डोकाडिया (१६), अब्दुल्ला डोकाडिया (३५) आणि शामील डोकाडिया (१२) यांचा समावेश आहे. या सर्वांना २६ एप्रिल रोजी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबीयांनी कोणत्याही कटाची शक्यता फेटाळून लावली आहे. घटनेनंतर तपास वेगाने सुरू असून फॉरेन्सिक टीमसह पोलीस प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत.

सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

रुग्णालयात 'डेथ ऑडिट' सुरू

सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयात 'डेथ ऑडिट' देखील सुरू करण्यात आले आहे. या ऑडिटद्वारे उपचारात काही हलगर्जीपणा झाला होता का, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की, रुग्णांवर मेडिकल प्रोटोकॉलनुसारच उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांची एक समिती या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांच्या रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. विषारी घटकांमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणाने, हे सध्या स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

फूड पॉयझनिंगची शक्यता फेटाळली

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. गरज पडल्यास तज्ज्ञांचं मतही घेतले जाईल. तसेच, जे. जे. रुग्णालयात या चौघांचे डेथ ऑडिट सुरू झाले आहे. यातून उपचारात झालेला विलंब किंवा हलगर्जीपणा समोर येईल. रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी फूड पॉयझनिंगची शक्यता फेटाळून लावली आहे.

Web Title : पायधुनी मौतें: तरबूज मामले में नया मोड़, चार की हैरान करने वाली ब्लड रिपोर्ट आई।

Web Summary : मुंबई परिवार की मौत के मामले में नया मोड़। प्रारंभिक खाद्य विषाक्तता सिद्धांतों को चुनौती दी गई। रक्त रिपोर्ट में कोई जीवाणु संक्रमण नहीं। मौत का कारण निर्धारित करने के लिए एफएसएल रिपोर्ट का इंतजार; परिवारों ने बेईमानी से इनकार किया। अस्पताल डेथ ऑडिट जारी।

Web Title : Pyadhuni Deaths: Watermelon case twist, puzzling blood reports of four revealed.

Web Summary : Mumbai family's death case sees a twist. Initial food poisoning theories are challenged. Blood reports reveal no bacterial infection. FSL report awaited to determine cause of death; families deny foul play. Hospital death audit underway.