Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

IPL कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड! सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकण्याचाही साधलाय डाव

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 20:08 IST2026-05-07T19:58:52+5:302026-05-07T20:08:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 LSG vs RCB Bhuvneshwar Kumar First Fast Bowler In IPL History To Play 200 Matches | Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

Bhuvneshwar Kumar 200 IPL Matches:  भारताचा अनुभवी गोलंदाज आणि स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमार याने आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५० व्या सामन्यात मैदानात उतरताच 'द्विशतकी' डाव साधत नवा इतिहास रचला आहे. लखनौच्या इकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. हा सामना भुवीसाठी खास आहे. कारण IPL मध्ये २०० वा सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. यासह IPL च्या इतिहासात २०० सामने खेळणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात २०० सामने खेळणारा तो १२ वा खेळाडू आहे. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत २७८ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ रोहित शर्मा २७७ सामन्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.  

  • महेंद्रसिंग धोनी : २७८ सामने (२००८-२०२५)
  • रोहित शर्मा: २७७ सामने (२००८-२०२६)
  • विराट कोहली: २७६ सामने (२००८-२०२६)
  • रवींद्रसिंह जडेजा: २६४ सामने (२००८-२०२६)
  • दिनेश कार्तिक: २५७ सामने (२००८-२०२४)
  • शिखर धवन: २२२ सामने (२००८-२०२४)
  • रविचंद्रन अश्विन: २२१ सामने (२००९-२०२५)
  • अजिंक्य रहाणे: २०७ सामने (२००८-२०२६)
  • सुरेश रैना : २०५ सामने (२००८-२०२१)
  • रॉबिन उथप्पा: २०५ सामने (२००८-२०२२)
  • अंबाती रायुडू: २०४ सामने (२०१०-२०२३)
  • भुवनेश्वर कुमार: २०० सामने (२०११-२०२६)
     

RCB नं पहिली बोली लावली, पण पुण्याच्या संघाकडून मिळाली पहिली संधी

भुवनेश्वर कुमारने २०१० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून आयपीएलच्या प्रवासाची सुरुवात केली. पण या हंगामात RCB च्या संघाने त्याला एकही संधी दिली नाही. RCB च्या संघाने रिलीज केल्यावर  २०११ मध्ये तो पुणे पुणे वॉरियर्स संघाचा भाग झाला. याच संघाकडून पदार्पण करताना त्याने आपली पहिली विकेट घेतली. २०१३ च्या हंगामापर्यंत तो पुण्याच्या संघाचा भाग होता. 

बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?

सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून सोडली खास छाप

२०१४ मध्ये भुवी ४.२५ कोटींच्या प्राइज टॅगसह सनरायझर्स हैदराबादचा झाला. या संघाकडूनच तो स्टार झाला. २०१६ च्या हंगामात आणि २०१७ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून त्याने अनुक्रेम २३ आणि २६ विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली होती. सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याचा खास विक्रम नोंदवण्याआधी याच हंगामात त्याने या स्पर्धेत २०० विकेट्सचा टप्पा गाठला होता. अशी कामगिरी करणाराही तो पहिला जलदगती गोलंदाज आहे.

Web Title : भुवनेश्वर कुमार: स्विंग के बादशाह ने रचा इतिहास, 200 आईपीएल मैच खेलने वाले पहले तेज गेंदबाज

Web Summary : भुवनेश्वर कुमार ने 200 आईपीएल मैच खेलकर इतिहास रचा। पहले आरसीबी के साथ, उन्होंने पुणे के लिए पदार्पण किया, बाद में सनराइजर्स हैदराबाद के लिए खेले। उनके नाम लगातार पर्पल कैप जीतने का रिकॉर्ड है और 200 विकेट लेने वाले पहले तेज गेंदबाज भी हैं।

Web Title : Bhuvneshwar Kumar: Swing King Makes History, First Fast Bowler to 200 IPL Matches

Web Summary : Bhuvneshwar Kumar achieves a milestone, becoming the first fast bowler to play 200 IPL matches. Initially with RCB, he debuted with Pune, later starring for Sunrisers Hyderabad. He also holds the record for consecutive Purple Caps and was the first pacer to 200 wickets.