पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:35 IST2026-05-07T20:32:25+5:302026-05-07T20:35:00+5:30
तत्पूर्वी, मंगळवारी (६ मे २०२६) ममता बॅनर्जी यांनी आपण राजीनामा देणार नाही, असे म्हणत, हा निकाल म्हणजे लोकशाहीचा कौल नसून एक मोठे कारस्थान आहे. टीएमसीची लढाई भाजपशी नसून निवडणूक आयोगाशी होती, ज्याने भाजपसाठी काम केले, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.

पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. यानंतर राज्यपालांनी आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करत, पश्चिम बंगालचे मंत्रिमंडळ बरखास्त केले. खरेतर, या विधानसभेचा कार्यकाळ ८ मे २०२१ ते ७ मे २०२६ पर्यंतच होता. अर्थात नियमानुसारच जुनी विधानसभा भंग करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, मंगळवारी (६ मे २०२६) ममता बॅनर्जी यांनी आपण राजीनामा देणार नाही, असे म्हणत, हा निकाल म्हणजे लोकशाहीचा कौल नसून एक मोठे कारस्थान आहे. टीएमसीची लढाई भाजपशी नसून निवडणूक आयोगाशी होती, ज्याने भाजपसाठी काम केले, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
याशिवाय, "जवळपास १०० जागांवर जनादेशाची लूट झाली. पक्षाचे मनोबल खच्ची करण्यासाठी मुद्दामहून मतमोजणी संथ गतीने करण्यात आली," असेही ममता म्हणाल्या. एवढेच नाही तर, आता आपण 'मुक्त पक्ष्याप्रमाणे' आहो. आपण रस्त्यावर उतरून अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारू. तसेच, राष्ट्रीय स्तरावर 'इंडिया' आघाडी मजबूत करण्यावर आपला भर असेल, असेही ममता यांनी म्हटले आहे.
Governor of West Bengal, RN Ravi, has issued an Order dissolving the West Bengal Legislative Assembly with effect from 07 May 2026. pic.twitter.com/IuEAylWege
— ANI (@ANI) May 7, 2026
९ मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी -
दरम्यान, बंगालमधील भाजपच्या पहिल्या सरकारचा शपथविधी ९ मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सुमारे ४,००० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.