Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:46 IST2026-05-07T19:45:42+5:302026-05-07T19:46:57+5:30
Nagpur : नागपूरमध्ये एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा राग मनात धरून, एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आपल्या २६ वर्षीय सावत्र आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार

Nagpur Crime: Shocking! 21-year-old youth rapes stepmother; victim is four months pregnant
नागपूर: नागपूरमध्ये एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा राग मनात धरून, एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आपल्या २६ वर्षीय सावत्र आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारामुळे पीडित महिला चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी तरुण अक्षत श्रीवास्तव याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित २६ वर्षीय महिला नोकरीच्या शोधात असताना, २०२४ मध्ये तिची भेट एका खासगी बँकेत मॅनेजर असलेल्या ५५ वर्षीय विकास श्रीवास्तव यांच्याशी झाली. सुरुवातीला नोकरीच्या निमित्ताने झालेली ही ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
मुलगा लग्नामुळे होता नाराज
विकास श्रीवास्तव यांचा २१ वर्षीय मुलगा अक्षत हा या लग्नाच्या निर्णयामुळे प्रचंड संतापलेला होता. त्याने आपल्या वडिलांच्या या दुसऱ्या लग्नाला कडाडून विरोध दर्शवला होता. याच रागातून आणि द्वेषातून त्याने आपल्या सावत्र आईवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या अत्याचारानंतर ती चार महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब समोर आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपी अक्षत श्रीवास्तव याला बेड्या ठोकल्या आहेत.