पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:22 IST2026-05-07T19:21:51+5:302026-05-07T19:22:10+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना, चार हल्खोर एका दुचाकीवरून तेथे पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने एका पाठोपाठ एक असे तीन बॉम्ब फेकून पळून गेले, असे  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

Post-election violence continues in West Bengal! Bomb hurled at BJP workers in Howrah Five people critical | पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर

यावेळी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचत, भाजपला बहुमताने सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचलवे आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर तेथे उसळलेला हिंसाचार अद्यापही थांबण्याचे नाव नाही. बुधवारी रात्रीच्या सुमारास हावडा येथे बॉम्बफेक करून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.  या हल्ल्यात ५ भाजप कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी आरजी कर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीहाटी येथील वॉर्ड क्रमांक २ मधील दत्त रोड परिसरात ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना, चार हल्खोर एका दुचाकीवरून तेथे पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने एका पाठोपाठ एक असे तीन बॉम्ब फेकून पळून गेले, असे  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. खर्डा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, हा हल्ला तृणमूल काँग्रेस पुरस्कृत गुंडांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र तृणमूलने हा आरोप फेटाळून लावला आहे.

भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार -
याशिवाय, पश्चिम बंगालमधील इतरही ठिकाणांवरून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बशीरहाट परिसरात रोहित राय या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. रोहित राय आपल्या भागात पक्षाचे झेंडे लावत असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली, असा दावा भाजपने केला आहे. 

रोहित राय यांच्या पोटात गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याच बरोबर, उत्तर कोलकात्याच्या बारानगर भागातही एका भाजप कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title : पश्चिम बंगाल में चुनाव के बाद हिंसा जारी; बीजेपी कार्यकर्ताओं पर बम हमला।

Web Summary : पश्चिम बंगाल में चुनाव के बाद हिंसा जारी है। हावड़ा में बीजेपी कार्यकर्ताओं पर बम फेंके गए, जिसमें पांच घायल हो गए। बीजेपी ने टीएमसी पर आरोप लगाया है, जिसे टीएमसी ने खारिज कर दिया है। उत्तर 24 परगना में एक बीजेपी कार्यकर्ता को गोली मारी गई, कोलकाता में दूसरे पर चाकू से हमला किया गया।

Web Title : Post-election violence continues in West Bengal; Bombing targets BJP workers.

Web Summary : Violence persists in West Bengal after elections. In Howrah, BJP workers were bombed, injuring five. The BJP alleges TMC involvement, which TMC denies. Elsewhere, a BJP worker was shot in North 24 Parganas; another stabbed in Kolkata.