Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला

आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे शतक ठरले

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 22:06 IST2026-05-07T21:39:39+5:302026-05-07T22:06:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Mitchell Marsh Records Lucknow Super Giants’ Fastest Century During LSG vs RCB Clash | Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला

Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला

Mitchell Marsh Fastest IPL Century : लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. अर्शिन कुलकर्णीच्या साथीनं LSG च्या डावाची सुरुवात करणाऱ्या मिचेलनं फक्त २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. पावसामुळे खेळात व्यत्यय येत असताना त्याने आपल्या खेळीतील धमाका कायम ठेवत शतकी खेळीसह मोठा डाव साधला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

RCB च्या गोलंदाजांची धुलाई करताना मार्शनं अवघ्या  ४९ चेंडूत IPL कारकिर्दीतील आपले दुसरे शतक झळकावले. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वात जलद शतकी खेळी ठरली. याआधी २०२५ च्या हंगामात मिचेल मार्शनं गुजरात विरुद्धच्या सामन्यात ६४ चेंडूत शतक साजरे केले होते. 

Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

रिषभ पंतसह KL राहुलचा विक्रम मोडला

लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून याआधी सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा रिषभ पंतच्या नावे होता. पंतने गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ५४ चेंडूत शतक झळकावले होते. हा विक्रम मोडीत काढत LSG कडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मिचेल मार्श अव्वलस्थानी पोहचला आहे.  हा डाव साधताना त्याने लोकेश राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनाही मागे टाकले. 

लखनौच्या संघाकडून जलद शतक झळकवणारे फलंदाज

  • मिचेल मार्श- ४९ चेंडू विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ (७ मे २०२६) 
  • रिषभ पंत- ५४ चेंडू विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ (२७ मे २०२५)
  • केएल राहुल - ५६ चेंडू विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई (१६ एप्रिल २०२२) 
  • मार्कस स्टॉयनिस - ५६ चेंडू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई (२३ एप्रिल २०२४)
  • मिचेल मार्श – ५६ चेंडू विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद (२२ मे २०२५) 
  • क्विंटन डी कॉक - ५९ चेंडू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, नवी मुंबई (१८ मे २०२२)
  • केएल राहुल – ६१ चेंडू विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई (WS) (२४ एप्रिल २०२२) 

Web Title : बारिश के बाद लखनऊ में मिचेल मार्श का तूफ़ान: बनाया रिकॉर्ड!

Web Summary : लखनऊ के एकाना स्टेडियम में मिचेल मार्श ने आरसीबी के खिलाफ 49 गेंदों में रिकॉर्ड तोड़ शतक बनाया। 20 गेंदों में अर्धशतक के साथ शुरू हुई उनकी विस्फोटक पारी लखनऊ सुपर जायंट्स के लिए सबसे तेज शतक थी, जो उनके पिछले रिकॉर्ड को तोड़ती है।

Web Title : Mitchell Marsh's Century Storms Lucknow After Rain Interruption: A Record!

Web Summary : Mitchell Marsh smashed a record-breaking century in just 49 balls against RCB at Lucknow's Ekana Stadium. His explosive innings, starting with a 20-ball fifty, marked the fastest century for Lucknow Super Giants, surpassing his previous record.