रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

Updated:May 7, 2026 17:01 IST2026-05-07T16:57:13+5:302026-05-07T17:01:57+5:30

Make 7 dishes with juicy fresh mangoes, summer special list for great recipes : उन्हाळ्यात करा आंब्याचे विविध पदार्थ, पाहा रेसिपी.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

आंब्याचे विविध पदार्थ करता येतात. हे ७ पारंपरिक आंब्याच्या गरापासून केले जाणारे पदार्थ चविष्ट आणि फोटभरीचे असतात. पाहा यादी आणि नक्की करुन पाहा.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

उन्हाळा म्हटला की आमरस हा अनेकांच्या जेवणातील खास पदार्थ असतो. पिकलेल्या गोड आंब्याचा गर काढून त्यात थोडी साखर, वेलची किंवा दूध घालून आमरस तयार केला जातो. पुरीसोबत खाल्ला जाणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

आंब्याचा रस उन्हात सुकवून तयार केली जाणारी आंबापोळी ही पारंपरिक आणि टिकाऊ मिठाई मानली जाते. गावाकडे अजूनही घरच्या घरी आंबापोळी बनवण्याची पद्धत आहे. प्रवासात, डब्यात किंवा गोड खाण्याची इच्छा झाली की हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

उकडीच्या किंवा माव्याच्या मोदकांमध्ये आंब्याचा गर वापरून तयार केलेले मोदक चवीला खूप खास लागतात. खास पाहुण्यांसाठी हा फ्युजन पदार्थ बनवला जातो. आंब्याच्या गोड चवीमुळे मोदक अधिक मऊ आणि स्वादिष्ट होतात.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

आंब्याचा गर, साखर आणि तूप वापरून बनवली जाणारी आंब्याची पापडी ही पारंपरिक गोड डिश आहे. काही ठिकाणी त्यात सुका मेवाही घातला जातो. ही पापडी चवीला मऊ आणि सुगंधी लागते त्यामुळे सणासुदीला अनेक घरांत ती केली जाते.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

श्रीखंडात आंब्याचा गर मिसळून तयार केलेले मँगो श्रीखंड हे थंडगार आणि स्वादिष्ट डेझर्ट मानले जाते. यात वेलची, केशर किंवा ड्रायफ्रूट्स घातल्याने चव आणखी वाढते. उन्हाळ्यात जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून हे खास दिले जाते.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

आंब्याच्या गरापासून तयार होणारे मँगो आइस्क्रीम मुलांना विशेष आवडते. बाजारातील आइस्क्रीमसोबतच अनेक जण घरच्या घरीही हे तयार करतात. उन्हामुळे शरीराला थंडावा मिळावा आणि आंब्याची चव अनुभवता यावी म्हणून हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.

रसाळ ताज्या आंब्याचे करा ७ पदार्थ, एकापेक्षा एक भारी, एक चमचा खाताच सगळे कराल फस्त..

दूध, आंबा आणि ड्रायफ्रूट्स वापरुन केले जाणारे मँगो मिल्कशेक पोटभरीचं पेय आहे . सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी थंड पेय म्हणून पिऊ शकता. उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय समजला जातो.