जेवणात रोज भात खाल्ला तर शरीराचं काय नुकसान होतं? समजून घ्या अति भात खाण्याचे तोटे
Updated:May 7, 2026 15:46 IST2026-05-07T15:30:47+5:302026-05-07T15:46:43+5:30
Disadvantages of Eating White Rice Daily : रोज जास्त प्रमाणात पांढरा भात खाल्ल्यानं उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हटलं जातं.

भात हा आपल्या आहारातील एक मुख्य भाग असला तरी त्याचे अतिसेवन किंवा रोजच्या खाण्यामुळे शरीराला काही समस्या उद्भवू शकतात. भात खाण्याचे तोटे समजून घ्या. (Disadvantages of Eating White Rice Daily)
वजन वाढणं
भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही जास्त प्रमाणात भात खाल्ला आणि त्या तुलनेत शारीरिक हालचाल कमी असते. तर शरीरात चरबी साठून वजन वेगानं वाढतात. (Why Eating White Rice Every day Might Be Harmful)
रक्तातील साखर वाढणं
पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तो खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्यानं वाढते. त्यामुळे मधुमेहींसाठी किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका आहे त्यांच्यासाठी रोज भात खाणं घातक ठरतं.
पचनाच्या तक्रारी
काही लोकांना रोज भात खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या जाणवू शकते. कारण पांढऱ्या भातावर प्रक्रिया करताना त्यातील नैसर्गिक फायबर काढून टाकले जाते.
झोप
भात खाल्ल्यानंतर शरीरातील सेरोटोनिन आणि ट्रिप्टोफॅन नावाचे घटक वाढतात. ज्यामुळे खाल्ल्यानंतर लगेच आळस आणि सुस्ती जाणवते. कामाच्या ठिकाणी यामुळे एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
पोषक तत्वांची कमतरता
जर तुम्ही केवळ भातच जास्त खात असाल आणि आहारात इतर भाज्या किंवा प्रथिनं कमी असतील तर शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजं मिळत नाहीत.
मेटाबॉलिक सिंड्रोम
रोज जास्त प्रमाणात पांढरा भात खाल्ल्यानं उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हटलं जातं.
भात खाताना ही काळजी घ्या
भात खाताना पूर्ण ताट भरून न खाता वाटीभर भात खा. पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खा. आहारात कडधान्यांचा समावेश असावा. भात खाताना त्यात भाज्या किंवा कडधान्य मिसळा. जेणेकरून त्याचे पोषण मूल्य वाढेल.