सैफ अली खानच्या 'कर्तव्य'चा ट्रेलर प्रदर्शित; सौरभ द्विवेदींच्या भूमिकेनं वेधलं सर्वांचं लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:42 IST2026-05-07T17:22:29+5:302026-05-07T17:42:32+5:30
'कर्तव्य' चित्रपटात सैफने 'पवन' नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

सैफ अली खानच्या 'कर्तव्य'चा ट्रेलर प्रदर्शित; सौरभ द्विवेदींच्या भूमिकेनं वेधलं सर्वांचं लक्ष!
बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित 'कर्तव्य' (Kartavya) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात सैफ एका कर्तव्यदक्ष पण वैयक्तिक आयुष्यात संघर्षाचा सामना करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
'कर्तव्य' चित्रपटात सैफने 'पवन' नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पोलीस वर्दीतील सैफ अली खानचा लूक आणि त्याचा वावर अत्यंत प्रभावी वाटतोय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सैफ म्हणाला, "पवन स्वतःच्याच मनाशी झगडत आहे. कर्तव्याची ही संकल्पना मला खूप भावली, कारण ती तुम्हाला कठीण निवड करण्यासाठी भाग पाडते, ज्यासाठी कधीकधी मोठी वैयक्तिक किंमत मोजावी लागते".
तगडी स्टारकास्ट
'कर्तव्य' या चित्रपटात सैफ अली खानसोबत प्रतिभावन अभिनेत्री रसिका दुग्गल त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय संजय मिश्रा, झाकीर हुसेन, मनीष चौधरी आणि सौरभ द्विवेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. उत्कृष्ट संवाद आणि खिळवून ठेवणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे ट्रेलर अधिक उत्कंठावर्धक झाला आहे.