ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 09:32 PM2019-08-11T21:32:45+5:302019-08-11T21:33:14+5:30

राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे.

Non-cooperation movement of village workers | ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : १६ ला धरणे, तर २२ ला कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे.
कारंजा तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर धरणे दिले. त्यानंतर तालुकाध्यक्ष प्रदीप ताठे, उपाध्यक्ष राष्ट्रपाल कांबळे आणि सहसचिव नरेंद्र गुळघाणे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयाचे पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवकांना शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता द्यावा, शैक्षणिक अर्हता बदलवून पदवीधर ग्रामसेवक नेमण्यात यावे, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामसेवकाचे साजे व पदे वाढवावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतनातील त्रुटी दूर कराव्या, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवकांना आगावू वेतनवाढ द्यावी, एक गाव, एक ग्रामसेवक निर्माण करावा, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करून विभागाशिवाय इतर कामे देऊ नये, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
क्रांतीदिनापासून ७ टप्प्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्टला पंचायत समिती समोर दुसºया टप्प्यात १३ आॅगस्टला जिल्हा परिषदेसमोर तर तिसºया टप्प्यात १६ आॅगस्टला आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. चौथ्या टप्प्यात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ग्रामसेवक एकत्र होत निवेदन देतील. २० आॅगस्टला ग्रामविकास राज्यमंत्री आणि प्रधान सचिवांचे शासकीय निवासस्थानासमोर एकदिवसीय उपोेषण, २१ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांना, संघटनेचे सर्व जिल्हा सचिव निवेदन देतील आणि अखेरच्या टप्प्यात २२ आॅगस्टपासून राज्यभर सर्व ग्रामसेवक कामबंद आंदोलन करीत गटविकास अधिकाºयांना निवेदन देणार आहेत.

Web Title: Non-cooperation movement of village workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.