थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:00 IST2026-05-07T14:00:10+5:302026-05-07T14:00:50+5:30

TVK Vijay Swearing-in: चेन्नईत थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडल्याने तणाव. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात सत्तास्थापनेसाठी युतीची चर्चा? वाचा सविस्तर अपडेट.

TVK Vijay Swearing-in: Thalapathy Vijay was supposed to take oath as Chief Minister on May 7, but it didn't happen; Thousands of supporters turned back... | थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...

थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...

तामिळनाडूच्या राजकारणात गुरुवारी अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय यांचा ७ मे रोजी होणारा नियोजित शपथविधी सोहळा अनपेक्षितपणे लांबणीवर पडला आहे. यामुळे चेन्नईच्या नेहरू इंडोर स्टेडियमवर मोठ्या आशेने जमलेल्या हजारो समर्थकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. तर विजयने राज्यपालांची दोनवेळा भेट घेतली असून, राज्यपालांनी ११८ आमदारांच्या सह्या आणा, असे सांगितल्याने विजयला माघारी परतावे लागले आहे. 

सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे राज्याच्या कानाकोपऱ्यातून विजय यांचे समर्थक स्टेडियमवर पोहोचले होते. मात्र, स्टेडियमचे दरवाजे बंद असल्याचे पाहून आणि कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. प्रशासनाकडून या विलंबाबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

VCK ची भूमिका: "विजय यांनाच संधी द्या"
VCK प्रमुख थोल तिरुमावलवन यांनी विजय यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. "बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राज्यपालांनी विजय यांना रोखणे घटनाबाह्य आहे. त्यांना प्रथम मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ द्यावी, विधानसभा हे बहुमत सिद्ध करण्याचे ठिकाण आहे," असे तिरुमावलवन यांनी म्हटले आहे. दरम्यान, विजय यांनी पाठिंब्यासाठी VCK कडे धाव घेतली असून, तिरुमावलवन यांनी द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टालिन यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

'द्रमुक-अण्णा द्रमुक' एकत्र येणार?
राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा परंपरागत शत्रू मानल्या जाणाऱ्या DMK (द्रमुक) आणि AIADMK (अण्णा द्रमुक) यांच्यात छुप्या चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले. 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, दोन्ही पक्षांमध्ये 'बॅकचॅनल' चर्चा सुरू आहे. अण्णा द्रमुकने सरकार स्थापन करावे आणि द्रमुकने बाहेरून पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये काही लहान पक्षांनाही सोबत घेण्याचा विचार सुरू आहे. यावर आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला टीव्हीके सरकार स्थापन करतो का याची वाट पाहू. तसेच सहा महिन्यांपर्यंत राज्यातील राजकारणात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवू,  असे स्टॅलिन म्हणाले आहेत.

डाव्यांचा निर्णय उद्या
CPI(M) नेते पी. शन्मुगम यांनी सांगितले की, विजय यांनी त्यांच्या पक्षाला पाठिंब्यासाठी पत्र पाठवले आहे. यावर शुक्रवारी सकाळी होणाऱ्या राज्य समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

 

Web Title : थलपति विजय के मुख्यमंत्री पद की शपथ स्थगित; समर्थक निराश, घर लौटे।

Web Summary : विजय के मुख्यमंत्री पद की शपथ अप्रत्याशित रूप से स्थगित, हजारों निराश। वीसीके विजय का समर्थन करता है, जबकि डीएमके और एआईएडीएमके कथित तौर पर बातचीत कर रहे हैं। वाम दल समर्थन पर फैसला करेंगे।

Web Title : Thalapathy Vijay's CM oath postponed; supporters disappointed, return home.

Web Summary : Vijay's CM oath ceremony was unexpectedly postponed, disappointing thousands. VCK supports Vijay, while DMK and AIADMK are reportedly in talks. Left parties to decide on support.